ETV Bharat / bharat

कोरानाची तिसरी लाट टाळणे शक्य नाही- केंद्र सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांचा इशारा - corona third wave warning by gov

केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन म्हणाले, की तिसरी लाट लाट कधी व किती प्रमाणात येणार हे स्पष्ट नाही. मात्र, आपण नवीन लाटांसाठी तयार असले पाहिजे.

के विजयराघवन
के विजयराघवन
author img

By

Published : May 5, 2021, 5:23 PM IST

Updated : May 5, 2021, 6:13 PM IST

नवी दिल्ली- सध्याच्या टप्प्यावर कोरोनाची तिसरी लाट टळता येऊ शकत नसल्याचा इशारा केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन म्हणाले, की तिसरी लाट लाट कधी व किती प्रमाणात येणार हे स्पष्ट नाही. मात्र, आपण नवीन लाटांसाठी तयार असले पाहिजे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा सामना करता लस ही अद्ययावत करण्याची गरज आहे. नव्या स्ट्रेनचा देशभरात वेगाने संसर्ग झाला आहे. ज्या पद्धतीने विषाणुचा उच्च पातळीवर संसर्ग झाला आहे, ते पाहता तिसरा टप्पा (तिसरी लाट) टाळता येणार नाही. आपण कोरोनाच्या नवीन लाटेकरिता अधिक चांगल्या पद्धतीने तयार असू, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी कोरोना हा प्राण्यांमधून मानवामध्ये पसरत नसल्याचे स्पष्ट केले. कोरोना हा मानवांमधून मानवामध्ये पसरत असल्याचे पॉल यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा-ख्रिश्चन धर्मगुरुंकडून कोरोनाचे उल्लंघन करत प्रार्थना; 100 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू

केंद्र सरकारच्या धोरणावर जगभरातून टीका-

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये बुधवारी कोरोनामुळे ३,७८० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात ऑक्सिजन, रुग्णालयात बेड, रेमडेसिवीरसारखी औषधे नसल्याने केंद्र सरकारविरोधात टीका करण्यात येत आहे. दुसरीकडे लशींचा पुरेसा साठा नसल्याने देशात लसीकरण मोहिम कासवगतीने सुरू आहे. देशात कोरोनाबाधित व त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढविण्याला मोदी सरकार कारणीभूत असल्याचे विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांनी टीका केली आहे.

नुकतेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता घेऊन ऑक्सिजनचे प्लांट सुरू करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

हेही वाचा-तामिळनाडू : एम. के. स्टॅलिन ७ मे रोजी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; दहा वर्षानंतर सत्ता

Last Updated : May 5, 2021, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.