ETV Bharat / bharat

Delhi Liquor Scam Case : दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी के कविता यांची सीबीआय चौकशी; समर्थकांची पोस्टरबाजी - Poster in support K K Kavita

दिल्ली दारू घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआय आज TRS आमदार कविता यांची त्यांच्या बंजारा हिल्स निवासस्थानी चौकशी करणार ( CBI Question K K Kavita  आहे. के कविता यांच्या समर्थनार्थ परिसरात पोस्टरबाजी पहायला ( Poster in support K Kavita ) मिळाली.

Poster in support K K Kavita
कविता यांची चौकशी
author img

By

Published : Dec 11, 2022, 12:13 PM IST

हैदराबाद : केंद्रीय अन्वेषण ब्युरो आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या ( K Chandrasekhar Rao Daughter K Kavita ) आणि भारत राष्ट्र समिती विधान परिषद सदस्य के. कविता यांची चौकशी करणार ( CBI Question K Kavita ) आहे. चौकशीच्या एक दिवस आधी, त्यांच्या घराजवळ, त्यांच्या समर्थकांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर लावले. त्यावर घोषणा लिहिल्या होत्या. 'योद्ध्याची मुलगी घाबरणार नाही. आम्ही कविता अक्का सोबत आहोत अशा आशयाचे पोस्टर परिसरात पहायला ( Poster in support K Kavita ) मिळाले.

हैदराबादच्या निवासस्थानी तपास : मंगळवारी सीबीआयकडून 11 डिसेंबरला चौकशी होणार असे सांगण्यात आले होते. त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी तपासासाठी सीबीआय दाखल होणार आहे. त्यावर कविता यांच्याकडून 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ती तिच्या घरी हजर असेल असे तपास एजन्सीला सांगण्यात आले आहे. सीबीआयने त्यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात चौकशीसाठी नोटीस बजावली होती. चौकशी एजन्सीला पाठवलेल्या पत्रात कविता यांनी म्हटले होते की, तिने एफआयआरची प्रत आणि या प्रकरणी वेबसाइटवर उपलब्ध तक्रार वाचली आहे.

१०० कोटी रुपयांची लाच : सीबीआयने 2 डिसेंबर रोजी कविताला दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात चौकशीसाठी नोटीस बजावली होती. तपास यंत्रणेने तिला तपासासाठी त्यांच्या सोयीनुसार ठिकाण सांगण्यास सांगितले होते. या घोटाळ्यातील कथित लाचखोरीबाबत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात कविताचे नाव समोर आल्यानंतर, त्यांनी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले होते. दिल्ली न्यायालयात आरोपी अमित अरोरा यांच्यावर दाखल केलेल्या कोठडी अहवालात ईडीने म्हटले आहे की, "आतापर्यंतच्या तपासानुसार, आप नेत्यांच्या वतीने विजय नायरने साऊथ ग्रुप नावाचा एक गट आयोजित केला होता. के कविता, मंगुंता श्रीनिवास रेड्डी यांच्यामदतीने अमित अरोरा यांच्यासह विविध व्यक्तींमार्फत किमान १०० कोटी रुपयांची लाच घेतली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.