ETV Bharat / bharat

K Kavita Liquor Scam Case : दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी के. कविता ईडीसमोर हजर - दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी के कविता

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी के. कविता आज दिल्लीत ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाल्या. कविता यांनी या प्रकरणी ईडीच्या समन्सला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

K Kavita
के. कविता
author img

By

Published : Mar 20, 2023, 11:59 AM IST

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता आज दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाल्या. त्या काल बेगमपेट विमानतळावरून एका विशेष विमानाने राष्ट्रीय राजधानीकडे रवाना झाल्या होत्या. त्यांच्यासोबत राज्यमंत्री आणि त्यांचे भाऊ केटी रामाराव आणि खासदार संतोष कुमार होते. कविता यांनी या आधी या प्रकरणी 16 मार्चला ईडीसमोर हजर राहण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवले होते.

एजन्सीला लिहिले होते पत्र : दिल्लीत ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर होण्याच्या काही तास आधी त्यांनी एजन्सीला पत्र लिहिले होते की त्या वैयक्तिकरित्या या तपासात सहभागी होणार नाहीत. त्यांनी बीआरआस सरचिटणीस सोमा भरत कुमार यांना त्यांच्या वतीने ईडीसमोर हजर राहण्यासाठी अधिकृत केले होते. के. कविता म्हणाल्या होत्या की, त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले नसल्याने त्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत हजर होत आहेत. कविता यांनी असेही लिहिले होते की, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका 24 मार्च रोजी सूचीबद्ध असल्याने ईडीने जारी केलेल्या समन्सबाबत पुढील कारवाईपूर्वी निकालाची प्रतीक्षा करावी.

ईडीच्या समन्सला कविता कडून न्यायालयात आव्हान : कविता यांनी या प्रकरणी ईडीच्या समन्सला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ईडी जास्त कठोर धोरण अवलंबू शकते आणि या चौकशीच्या संदर्भात थर्ड डिग्री उपायांचा अवलंब करू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. 11 मार्च रोजी कविता स्वतः ईडीसमोर हजर झाल्या होत्या. महिला असूनही ईडीने त्यांना कार्यालयात बोलावले आणि रात्री 8.30 पर्यंत बसवले, यावर कविता यांनी आक्षेप घेतला होता. कविता म्हणाल्या होत्या की, त्यांनी सर्व संबंधित माहिती सादर केली आणि सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. तरी देखील त्यांचा फोन जप्त करण्यात आला.

हे ही वाचा : Budget Session 2023 : लोकसभेत आजही गोंधळ होण्याची शक्यता, विरोधी पक्षांच्या बैठकीत ठरणार रणनीती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.