ETV Bharat / bharat

DY Chandrachud : सलग दुसऱ्यांदा देशाला मिळणार मराठमोळे सरन्यायाधीश, डीवाय चंद्रचूड आज घेणार पदाची शपथ - मावळते सरन्यायाधीश उदय लळीत

देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड ( Justice DY Chandrachud ) यांचा शपथविधी आज होणार आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Droupadi Murmu ) त्यांना पदाची शपथ देतील. 1959 मधे जन्मलेले न्यायमूर्ती चंद्रचूड 13 मे 2016 पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

DY Chandrachud
न्या. डी. वाय. चंद्रचूड
author img

By

Published : Nov 9, 2022, 8:23 AM IST

नवी दिल्ली : देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड ( Justice DY Chandrachud ) यांचा शपथविधी आज होणार आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Droupadi Murmu ) त्यांना पदाची शपथ देतील. 1959 मधे जन्मलेले न्यायमूर्ती चंद्रचूड 13 मे 2016 पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देणार गोपनियतेची शपथ : मावळते सरन्यायाधीश उदय लळीत यांची जागा चंद्रचूड घेतील. लळीत हे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. मात्र, गुरुनानक जयंतीची सुटी असल्याने त्यांना सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात निरोप देण्यात आला होता.लळीत यांना सरन्यायाधीश म्हणून केवळ 74 दिवस काम करण्याची संधी मिळाली होती. कामकाजाच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या बाजुने निकाल दिला होता. भावी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ मिळणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या चंद्रचूड यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. चंद्रचूड यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून 13 मे 2016 रोजी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून ते कार्यरत होते.

असे आहे चंद्रचूड यांचे शिक्षण : डीवाय चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. धनंजय यशवंत चंद्रचूड असे त्यांचे पूर्ण नाव आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबीचे (LLB) शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी प्रतिष्ठित इनलॅक्स (InLaks)स्कॉलरशिपच्या मदतीने हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. हार्वर्डमध्ये, त्यांनी लॉ इन मास्टर्स (LLM) आणि फॉरेन्सिक सायन्स (SJD) मध्ये डॉक्टरेट पूर्ण केली. त्यांनी ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी, हार्वर्ड लॉ स्कूल, येल लॉ स्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ द विटवॉटरसँड, दक्षिण आफ्रिकेत व्याख्यानेही दिली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.