बिलासपूर - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हरीश या मुलाचे आज जयपूरच्या सुप्रसिद्ध राजमहल पॅलेस या हॉटेलमध्ये लग्न होत आहे. हरीशचे रिद्धी शर्मा या जयपूरच्या हॉटेल व्यावसाईकाच्या मुलीसोबत लग्न होत आहे. या अगोदरही जे पी नड्डा यांच्या मुलाचे लग्न जयपूरमध्येच झाले होते. जे पी नड्डा यांच्या गिरीश या मुलाचे लग्न 2020 मध्ये जयपूरच्या व्यावसाईक अजय ज्यानी यांच्या मुलीसोबत झाले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा जे पी नड्डा हे राजस्थानचे व्याही होत आहेत. या लग्न सोहळ्याला देशभरातील नामांकीत हस्ती हजेरी लावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हरीश नड्डाच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन बिलासपूरमध्ये 28 जानेवारीला होणार आहे. त्यात पाहुण्यांसाठी खास बिलासपुरी धामचा पाहुणचार करण्यात येणार आहे.
कोन आहे दुसरी सून - जयपूरची रिद्धी शर्मा ही जे पी नड्डा यांची होणारी दुसरी सून आहे. रिद्धीचे वडील रमाकांत शर्मा हे सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसाईक आहेत. मंगळवारपासून लग्नाच्या विविध विधीला सुरुवात झाली आहे. त्याचे काही फोटोही सोशल माध्यमात व्हायरल झाले आहेत. लग्नासाठी हॉटेल राजमहल पॅलेसमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. हॉटेलमध्ये शाही व्यवस्था करण्यात आली आहे.
नामांकीत पाहुण्यांची उपस्थिती : भाजप हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाच्या अध्यक्षाच्या मुलाचे लग्न असल्यामुळे देशभरातील अनेक नामांकीत मंडळी या लग्नाला हजेरी लावणार आहेत. यामध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला, राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक मंत्री, व्यावसाईकांची या लग्नाला हजेरी असणार आहे. जे पी नड्डा आणि त्यांची पत्नी मल्लिका नड्डा या पाहुण्यांचे स्वागत करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. देशभरातील नामांकीत मंडळी लग्नाला येणार असल्याने येथे तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
दिल्ली, बिलासपूरमध्येही पार्टी : हरीश नड्डा आणि रिद्धी शर्माच्या लग्नानंतर नड्डा परिवार दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. त्यानंतर दिल्लीत पार्टीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत होणाऱ्या पार्टीत खास पाहुणे सहभागी होणार आहेत. त्यानंतर जे पी नड्डा यांचे गाव असलेल्या बिलासपूर येथेही पार्टी होणार आहे. ही पार्टी 28 जानेवारीला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्टीची तयारीही जोरदार सुरू आहे.
बिलासपुरी धामचा स्वाद : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा हे हिमाचलच्या बिलासपूर येथील राहणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या पार्टीची बिलासपूरमध्येही जोरदार तयारी सुरू आहे. लग्नप्रसंगी बनवण्यात येणाऱ्या खास पदार्थांना हिमाचलमध्ये धाम म्हटले जाते. त्यामध्ये अनेक पदार्थाचा समावेश असतो. हिमाचलमध्ये कांगडी धाम ही कांगडा जिल्ह्याची ओळख आहे. मंडी जिल्ह्यात मंडियाली धाम सुप्रसिद्ध आहे. तसेच बिलासपूरमध्ये बिलासपुरी धाम म्हणून ओळखले जाते.
कोणत्या पक्वानांचा आहे समावेश : बिलासपुरी धाम ही हिमाचलमध्ये सुप्रसिद्ध असलेल्या खाद्यपदार्थांपैकी एक आहे. त्यामध्ये धोतो दाळ मुख्य आकर्षण असते. घन्डयाली, काळ्या हरभऱ्याचा खट्टा, कढी, राजमा, सेपू, मटर पनीर आणि भाताचा समावेश असतो. हिमाचलमध्ये लग्नप्रसंगी बनवण्यात येणारे हे पदार्थ विशेष कढईमध्ये बनवण्यात येतात. त्यांना स्थानिक भाषेत बोटी असे म्हटले जाते.
बिलासपूरमध्ये थाट : भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मुलाच्या लग्नाची पार्टी बिलासपूरमध्येही आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे बिलासपूरमध्येही व्हिआयपी पाहुणे या पार्टीला हजेरी लावणार आहेत. यात हिमाचलचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर, शांता कुमार, हिमाचलचे मंत्री, आमदार, खासदारांना निंमत्रण पाठवण्यात आले आहे. त्यासह भाजपच्या अनेत बड्या नेत्यांसह काही अधिकाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.
हेही वाचा - Kapil Patil : बाळासाहेबांच्या विचारांना किती पायदळी तुडवायचे? हा त्यांचा प्रश्न - केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील