ETV Bharat / bharat

JK DYSP Arrested For Extortion : जम्मू काश्मीरमध्ये लाच घेतल्यानं पोलीस उपाधीक्षक अटकेत, न्यायालयानं ठोठावली कोठडी

JK DYSP Arrested For Extortion : भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली जम्मू काश्मीर पोलीस दलातील पोलीस उपाधीक्षकाला अटक करण्यात आलं आहे. आदिल शेख असं या पोलीस उपाधीक्षकाचं नाव आहे. न्यायालयानं आदिल शेखला सहा दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

JK DYSP Arrested For Extortion
पोलीस उपाधीक्षक आदिल शेख
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 9:02 AM IST

श्रीनगर JK DYSP Arrested For Extortion : भ्रष्टाचार करुन पुरावा नष्ट केल्यानं जम्मू काश्मीर पोलीस दलातील पोलीस उपाधीक्षकाला अटक करण्यात आलं आहे. आदिल मुश्ताक शेख असं अटक करण्यात आलेल्या पोलीस उपाधीक्षकाचं ( Jammu Kashmir Police ) नाव आहे. आदिल शेखला श्रीनगर न्याय दंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार आदिल शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस महासंचालकांनी केली होती कारवाई : पोलीस उपाधीक्षक आदिल शेख हे जम्मू काश्मीर पोलीस सेवेतील 2015 बॅचचे अधिकारी आहेत. त्यांना भ्रष्टाचाराच्या विविध कलमाखाली अटक करण्यात आली आहे. आदिल शेखवर यापूर्वीही अनेकवेळा कारवाई करण्यात आली आहे. मार्च महिन्यात आदिल शेखवर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी कारवाई केली होती. त्यावेळी आदिल शेख श्रीनगर बाहेरील पांथाोच उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी ( SDPO ) म्हणून कार्यरत होते.

एसआयटीकडं सोपवली तपासाची जबाबदारी : पोलीस उपाधीक्षक आदिल शेख हे आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात मोठे वादात अडकले आहेत. त्यामुळे श्रीनगर दक्षिण विभागाचे पोलीस अधीक्षक गौरव सिरवरकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिसांनी पाच सदस्यीय विशेष तपास पथक तयार केलं आहे. या विशेष तपास पथकाकडं आदिल शेख यांच्या प्रकरणातील तपास सोपवण्यात आला आहे. तर न्याय दंडाधिकाऱ्यांनी कोठडी ठोठावल्यानं आदिल शेख यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

मेहबुबा मुफ्तीच्या मुलीची अडवली होती गाडी : पोलीस उपाधीक्षक आदिल शेख यांची कारकिर्द मोठी वादग्रस्त ठरत आहे. उधमपूरमधील काश्मीर विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरू प्रा खुर्शीद अंद्राबी यांच्या कारमधून टिंटेड फिल्म काढताना 2016 मध्ये आदिल शेखनं त्यांना शिविगाळ केली होती. या शिविगाळीचा व्हिडिओ प्रचंड वादग्रस्त ठरला होता. 2020 मध्ये आदिल शेख यांनी मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा यांचं वाहनही अडवलं होतं. त्यामुळे त्यांनी पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांच्याकडं तक्रार केली होती. मात्र आपण केवळ कर्तव्य बजावत होतो, असं स्पष्टीकरण आदिल शेकनं दिलं होतं. आदिल शेखचा भाऊ जम्मू काश्मीर काँग्रेसचा प्रवक्ता असून त्याच्यावरही एका महिलेची 10 लाख रुपयाची फसवणूक केल्याचा गुन्हा जम्मू काश्मीरमधील गुन्हे शाखेनं नोंदवला आहे.

हेही वाचा :

  1. अवंतीपोरामध्ये जैशच्या दोन दहशतवाद्यांना अटक; सुरक्षा दलांची कारवाई
  2. मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी कार्यालयावर फडकवला तिरंगा; भाजप कार्यकर्त्यांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.