ETV Bharat / bharat

Santosh Kumar Suman resigns : विरोधकांच्या बैठकीपूर्वी नितीश कुमार यांना धक्का, संतोष कुमार सुमन यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. जीतन राम मांझी यांचा मुलगा तथा अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष कुमार सुमन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. जीतन राम मांझी हे एनडीएमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Santosh Kumar Suman resigns
संतोष कुमार सुमन यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
author img

By

Published : Jun 13, 2023, 1:09 PM IST

पाटणा : पाटणा येथे 23 जून रोजी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना त्यांच्याच राज्यात मोठा झटका बसला आहे. बिहारमध्ये सरकारमध्ये असलेले हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष कुमार सुमन यांनी तडकाफडकी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

मांझी एनडीएमध्ये जाऊ शकतात: जीतनराम मांझी हे नितीश कुमार यांची महाआघाडी सोडून एनडीएमध्ये सामील होऊ शकतात, अशी बिहारच्या राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. ही चर्चा आज खरी ठरली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जागावाटपाच्या फॉर्म्युलावर मांझी हे नितीश कुमार यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. सध्या मांझी महाआघाडीत एकटे पडल्याची सांगण्यात येत आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मांझी पक्ष बदलू शकतात, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

अमित शाह यांच्या भेटीनंतर बदलले राजकारणातील वारे : जितन राम मांझी यांनी १३ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. तेव्हापासून ते भाजकडे झुकल्याची चर्चा सुरू झाली होती. तेव्हा या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, असे मांझी सांगत राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पर्वती दशरथ मांझी यांना भारतरत्न द्यावा, अशी त्यांनी अमित शाह यांच्याकडे मागणी केली.

मांझीमुळे नितीश कुमार यांच्या वाढल्या अडचणी : गेल्या काही महिन्यांपासून मांझी नितीश सरकारविरोधात वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे नितीश कुमार सरकारच्या अडचणीदेखील वाढल्या आहेत. बिहारमधील दारूबंदीची अंमलबजावणी सुरू असताना मांझी यांनी उघडपणे दारूबंदीला विरोध केला आहे. नितीश कुमार यांनी तेजस्वीला प्रोत्साहन दिल्याने मांझी यांची नाराजी होती. अशातच त्यांनी मुलगा संतोष सुमनला मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार करण्याकरिता राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत.

माझा मुलगा संतोष सुमन तरुण असून शिकलेला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांचे नाव पुढे आले आहे, त्यापेक्षा माझा मुलगा अधिक पात्र आहे. संतोष सुमन हे नेट पात्र आणि प्राध्यापक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी नाव असणाऱ्याला ते शिकवू शकतात-जीतनराम मांझी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.