ETV Bharat / bharat

Palamu Accident : पलामूमध्ये कारने १२ जणांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

झारखंडच्या पलामूमध्ये एका कारने १२ जणांना चिरडले. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. या प्रकरणी कारच्या मालकावर एफआयआर दाखल करण्यात आलाय.

Accident
अपघात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 8:54 AM IST

Updated : Aug 29, 2023, 10:03 AM IST

पलामू (झारखंड) : झारखंडच्या पलामूमध्ये एक मोठा अपघात झालाय. येथे एका कारने १२ जणांना चिरडले. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर कारमधील लोक घटनास्थळावरून पळून गेले. सर्व मृत एकाच गावातील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी मेदिनीराय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवले.

महिलेसह तिघांचा जागीच मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमानंतर गावकरी रस्त्याच्या कडेला एकत्र उभे होते. दरम्यान, डाल्टनगंज गढवा मार्गावर गढवा बाजूने भरधाव वेगात येणाऱ्या कारने १२ जणांना धडक दिली. यामध्ये एका महिलेसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले. या घटनेत उदल चौरसिया आणि रोहित चौरसिया या काका-पुतण्यांसह, मधू मेहता या महिलेचा मृत्यू झाला.

मृतांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाईची मागणी : या घटनेची पुष्टी करताना पलामूचे एसपी रिष्मा रमेशन यांनी सांगितलं की, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, कारच्या मालकावर गंभीर कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आलाय. या घटनेनंतर आमदार आलोक चौरसिया यांनी सर्व मृतांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केलीय.

बेतियामध्ये भरधाव बोलेरोने विद्यार्थ्यांना चिरडले : १९ ऑगस्टला बिहारमधील बेतिया येथे अशाच प्रकारची एक घटना घडली होती. येथे एका भरधाव बोलेरो कारने शाळेतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना चिरडले. या अपघातात तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यापैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका विद्यार्थ्याने दवाखान्यात उपचारादरम्यान जीव तोडला. या घटनेत सहा चिमुकले जखमी झाले होते.

हेही वाचा :

  1. Railway Bridge Collapse In Mizoram : मिझोरममध्ये मृत्यूचं तांडव, रेल्वेचा निर्माणाधीन पूल कोसळून 17 मजुराचा मृत्यू
  2. Mumbai Pune Expressway Accident : कंटेनर उलटल्यानं मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू
  3. Bettiah Accident : शाळेतून घरी परतणाऱ्या चिमुरड्यांना भरधाव बोलेरोने चिरडले; तिघांचा मृत्यू, पाच गंभीर

Last Updated : Aug 29, 2023, 10:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.