ETV Bharat / bharat

Jetpur Child labor case : तीन साडी कारखान्यातून तब्बल 29 बालकामगारांची सुटका!, कारखान्याच्या मालकांना अटक - जेतपूर साडी कारखान्यात बालकामगार

साडी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या जेतपूरमधून बालकामगाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेने पोलिसांच्या मदतीने तीन साडी कारखान्यांमधून तब्बल 29 मुलांची सुटका केली आहे.

Child labor
बालकामगार
author img

By

Published : Mar 3, 2023, 1:31 PM IST

राजकोट (गुजरात) : गुजरातच्या राजकोट जवळील जेतपूरमध्ये साडी छपाईचा मोठा उद्योग आहे. येथील तीन युनिटमध्ये कपड्यांना इस्त्री करण्याचे काम लहान मुलांकडून करवले जात होते. त्या बदल्यात रोजदारीच्या नावावर त्यांना एक रुपयाही मिळायची नाही. रोजदारी म्हणून त्यांना फक्त जेवण दिले जायचे. मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेकडून याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एक टीम तयार केली. त्यानंतर साडी प्रिंटिंगच्या तीन युनिटवर छापा टाकून 29 मुलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी तीन युनिटच्या मालकांवर बालमजुरी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुलांना बाल संरक्षण गृहात ठेवणार : 'सेव्ह द चिल्ड्रन' संस्थेला सर्वप्रथम या प्रकरणी माहिती मिळाली होती. संस्थेच्या पथकाने पोलिसांना सोबत घेऊन युनिटवर छापा टाकला. या मुलांना उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मजूरीसाठी आणण्यात आले होते. गेल्या ६ महिन्यांपासून मुलांकडून हे काम करवून घेतले जात होते. पोलिसांनी नवागढमधील सेम्स तबरेक प्रिंट फिनिशिंगमधील 12, नवागढमधील उत्तर दरवाजा भागातील काजल फिनिशिंग मधून 5 आणि नीता फिनिशिंगमधील 3 मुलांची सुटका केली आहे. सर्व मुलांना शहर पोलीस ठाण्यात आणून कोविड चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना राजकोटच्या बाल संरक्षण गृहात ठेवण्यात येणार आहे. मुलांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांना त्यांच्या राज्यात वापस पाठवले जाईल.

युनिटच्या मालकाविरुद्ध तक्रार दाखल : 'सेव्ह द चिल्ड्रन' संस्थेच्या टीम लीडर शितल प्रदीप यांनी सांगितले की, गुजरात एचआरआरसी फ्रेंड फॉर वुमन अँड चाइल्ड, सीआयडी क्राइम टीम, अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट राजकोट आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने बचपन बचाओ आंदोलन करण्यात आले आहे. सर्व मुलांना बालसुधारगृहात ठेवण्यात येईल, त्यानंतर त्यांना घरी पाठवण्याची तयारी केली जाईल. पोलिसांनी तिन्ही युनिटच्या मालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. रमेश आलम, दुखी मिया, पप्पूभाई, परसोत्तम गोरधन ढोलरिया, निसांग पटेल, अमित कुमार पासवान, अनिल पासवान यांच्याविरुद्ध बाल कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सर्व मुलांना आधी जेतपूर शहर पोलीस ठाण्यात आणून नंतर राजकोटला पाठवण्यात आले.

हेही वाचा : NIA Warrant Against Militants: एनआयए कोर्टाचे १३ दहशतवाद्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट, जम्मू काश्मिरात केल्या कुरापती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.