ETV Bharat / bharat

जेसिका लाल यांची बहिण सबरीना लाल यांचे निधन

सबरीना यांनी सांगितले होते की, जेसिका ही आपल्या जीवनात खूप आंनदी आणि सकारात्मक होती. मला तिची फक्त जन्मदिनी आणि पुण्यतिथीलाच कमी भासत नव्हती, तर दररोजच तिची कमी भासत होती. यासाठी मी माझ्या घरात तिचे विविध फोटो लावलेले आहेत आणि मी तिला विसरूही इच्छित नाही.

Jessica Lal's sister Sabrina passes away
जेसिका लाल यांच्या बहिण सबरीना लाल यांचे निधन
author img

By

Published : Aug 16, 2021, 10:41 AM IST

नवी दिल्ली: जेसिका लाल यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी मोठी लढाई लढणारी त्यांची बहिण सबरीना लाल यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले. अशी माहिती त्यांचे भाऊ रंजीत लाल यांनी दिली आहे.

बहिणीच्या स्मृत्यार्थ फाउंडेशन सुरू करण्याची होती इच्छा -

रंजीत लाल यांनी असे सांगितले की, सवरीना या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांचे रुग्णालयात जाणे-येणे चालूच होते. शनिवारी अचानक त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावे लागले. याचवेळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मागील वर्षी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महिलांच्या मदतीसाठी आपल्या बहिणीच्या स्मृत्यार्थ एक फाउंडेशन सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांची बहिण जेसिका लाल यांची दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये 1999 मध्ये हत्या झाली होती. जेसिकाला न्याय मिळण्यासाठी सबरीना यांनी मोठा संघर्ष केला होता.

सबरीना यांनी सांगितले होते की, जेसिका ही आपल्या जीवनात खूप आंनदी आणि सकारात्मक होती. मला तिची फक्त जन्मदिनी आणि पुण्यतिथीलाच कमी भासत नव्हती, तर दररोजच तिची कमी भासत होती. यासाठी मी माझ्या घरात तिचे विविध फोटो लावलेले आहेत आणि मी तिला विसरूही इच्छित नाही. तिचे फोटो मला नेहमीच तिची आठवण देत राहतात.

काय आहे जेसिका लाल हत्या प्रकरण?

प्रसिद्ध मॉडेल जेसिका लालची 29 एप्रिल 1999 च्या रात्री दिल्लीतील टॅमरिंड कोर्ट रेस्टॉरंटमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. जेसिकाने दारु सर्व्ह करण्यासाठी नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली होती. हरियाणामधील काँग्रेस नेते विनोद शर्मा यांचा मुलगा मनू शर्मा तिचा मारेकरी होता. जेसिकाला न्याय मिळण्यासाठी कुटुंबीयांना मोठा संघर्ष करावा लागला होता. खासदाराचा पुत्र असलेल्या सिद्धार्थ वशिष्ठ ऊर्फ मनू शर्मा याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, 2020 मध्ये दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एसआरबीच्या बैठकीत मनू शर्माच्या वागणूकीत बदल झाल्यामुळे त्याला तुरुंगातून मुक्त करण्याची शिफारस करण्यात आली होती. राज्यपालांनी शिफारस स्वीकारल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली. यावेळी जेसिका लाल त्यांच्या कुटुंबीयांशीही विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी सबरीना लाल असे म्हणाल्या होत्या की, जर त्याच्या वागणुकीत बदल झाला असेल तर मी त्याला माफ केले. मला त्याला तुरूंगातून सोडण्यात कोणताही आक्षेप नाही.

हेही वाचा - जेसिका लाल हत्याकांड : मनु शर्माला तुरूंगातून सोडण्याची शिफारस

हेही वाचा - अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा, 220 भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.