नवी दिल्ली : जया बच्चन या त्यांच्या कडक स्वभावासाठी ओळखल्या जातात. पती अमिताभ बच्चन यांच्यापासून मुलगा अभिषेक बच्चन, सुन ऐश्वर्या राय बच्चन हेही कायम सांगत असतात की जया बच्चन या शिस्त आणि शिष्टाचाराची कशा कडक आहेत. जया बच्चन यांना थोडा लवकर राग येतो असा त्यांचा स्वभाव आहे. त्यांना राग येण्याबद्दल त्यांच्या घरची मंडळीही बोलत असतात. परंतु, संसदेतही जया आपला राग व्यक्त करायला मागेपुढे पाहत नाहीत. आज मंगळवारी पुन्हा एकदा राज्यसभेत संतापाची लाट उसळली. जया बच्चन या नुकताच ऑस्कर पुरस्कार प्राप्त झालेल्या गाण्याबद्दल नाटू नाटू यावर बोलत होत्या त्यावेळी कुणीतरी मध्येच काहीतरी बोलले त्यावर त्या संतपल्या.
नाटू-नाटू टीमचे अभिनंदन : या गाण्याला ऑस्कर मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना, मध्येच काही खासदार काही बोलले तेव्हा जया बच्चन आपली बाजू मांडत होत्या. यावरून जया खवळल्या. आणि त्या रागावल्या. त्या रागारागने बोलत असताना उपराष्ट्रपती जगदीप धनखर सर्व काही पाहत होते. त्यांनी खासदारांना गप्प राहण्यास सांगितले आणि जया बच्चन यांना पुन्हा बोलत राहण्यास सांगितले. जया बच्चन यांनी बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी नाटू-नाटूच्या टीमचे आणि आरआरआर चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अभिनंदन केले.
तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने चित्रपटसृष्टीची खूप सेवा केली : आता जया बच्चन पुढे बोलत होत्या, की मध्येच पुन्हा काही खासदार काही बोलले. यावेळी जया काहीच न बोलता-बोलता थांबल्या. त्यावर उपाध्यक्ष म्हणाले की, मॅडम तुम्ही तुमचे बोलणे चालू ठेवा. तेव्हा जया म्हणाल्या की हा एक जुनाट आजार होत आहे. सभापतींना उद्देशून त्या म्हणाल्या की, मीही बोलू शकते, मलाही आवाज आहे. असभ्य वर्तन होता कामा नये, असे ते म्हणाल्या. त्यावर हे प्रकरण हाताळताना उपाध्यक्ष जगदीप धनखर म्हणाले की, मॅडम तुमचा आवाज खूप मोठा आहे. तुम्ही बोला. तसेच, तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने चित्रपटसृष्टीची खूप सेवा केली आहे. उपराष्ट्रपतींचे कौतुक ऐकून जया यांनी त्यांचे आभार मानले आणि पुन्हा आपले भाषण पूर्ण केले.