श्रीनगर: श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Srinagar Airport ) शनिवारी सकाळी सीआरपीएफ जवानाच्या सामानातून बंदुकीच्या गोळ्या आणि अश्रुधुराचे नळकांडे जप्त करण्यात ( CRPF personnel held with ammo at Srinagar airport ) आले. याआधी शुक्रवारी याच विमानतळावर दोन जवानांकडून इन्सास बंदुकीच्या दोन गोळ्या आणि बंदुकीची काडतुसे जप्त करण्यात आली होती. ( Assam Riffles ) ( National Riffles )
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ईटीव्ही भारतला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, विमानतळावरील सामानाच्या तपासणीदरम्यान, हवालदार राणा प्रतापच्या सामानातून दोन एके-47 रायफलच्या गोळ्या (7.62 मिमी), एक इन्सास बुलेट (5.56 मिमी) आणि एक अश्रुधुराचे नळकांडे जप्त करण्यात आला. तो सीआरपीएफच्या 161 बटालियनचा जवान आहे.
"श्रीनगरच्या डलगेट भागात तैनात असलेला प्रताप, इंडिगो एअरलाइन्सने श्रीनगरहून झारखंडची राजधानी रांचीला जाणार होता. मात्र, आता त्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे," असे अधिकाऱ्याने सांगितले.
विशेष म्हणजे आसाम रायफल्सचे जवान विजय पाल यांच्याकडून INSAS बंदुकीच्या दोन गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर राष्ट्रीय रायफल्सचे जवान बिबिन कुमार यांच्याकडून एके-47 बंदुकीचे एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. या तिन्ही प्रकरणांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : Kargil Vijaya Diwas : कारगील विजय दिवसाच्या निमित्ताने श्रीनगरमध्ये भव्य दुचाकी रॅली