ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; महाराष्ट्रातील जवान हुतात्मा - Jammu Kashmir Pakistan Ceasefire

राजौरी जिल्ह्यातील नौशेरामध्ये असणाऱ्या लाम भागात शनिवारी सकाळी पाकिस्तानी लष्कराने पुन्हा सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामध्ये देशाच्या एका जवानाला वीरमरण प्राप्त झाले असून, दुसरा एक जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

jammu and kashmir: an army havaldar was killed in cfv
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक जवान हुतात्मा
author img

By

Published : Nov 21, 2020, 10:56 AM IST

Updated : Nov 21, 2020, 11:36 AM IST

जम्मू काश्मीर : शनिवारी सकाळी पाकिस्तानी लष्कराने पुन्हा सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामध्ये देशाच्या एका जवानाला वीरमरण प्राप्त झाले असून, दुसरा एक जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. राजौरी जिल्ह्यातील नौशेरामध्ये असणाऱ्या लाम भागात ही घटना घडली.

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले असून, या भागात गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले सुरू असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली.

या महिन्यात राज्यातील तीन जवान हुतात्मा..

या महिन्यात महाराष्ट्रातील तीन जवान पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झाले आहेत. यामध्ये कोल्हापूरचे ऋषिकेश जोंधळे, नागपूरचे भूषण सतई आणि कोल्हापूरच्या करवीरमधील संग्राम पाटील यांचा समावेश आहे. जोंधळे आणि सतई यांना मागील आठवड्यात वीरमरण आले होते, तर पाटील यांना आज सकाळी वीरमरण प्राप्त झाले.

हेही वाचा : पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; पूंछ जिल्ह्यात झाला गोळीबार

Last Updated : Nov 21, 2020, 11:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.