हरिद्वार : हरिद्वार रेल्वे स्थानक अधीक्षकांना धमकीचे पत्र (threatening letter in Haridwar railway station) मिळाले आहे. या पत्रात 25 आणि 27 ऑक्टोबरला हरिद्वार, ऋषिकेश व्यतिरिक्त चारधाममध्ये बॉम्बस्फोट (Threat to bomb blast in Haridwar Rishikesh) करण्याची धमकी दिली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने (Terrorist organization Jaish e Mohammed) दिली आहे. पत्र प्राप्त झाल्यानंतर या सर्व ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी हरिद्वारच्या रेल्वे स्टेशनवर जैश ए मोहम्मदचे धमकीचे पत्र मिळाले आहे. 25 आणि 27 तारखेला हरिद्वार, ऋषिकेश आणि चारधाम येथे बॉम्बस्फोटाची धमकी (Threat to bomb blast in Haridwar Rishikesh) धमकी मिळाली आहे. धमकीचे हे पत्र 10 ऑक्टोबरला आले होते, मात्र पोलिसांनी या प्रकरणाकडे आतापर्यंत लक्ष दिले नव्हते होते. पहिल्यांदाच असे धमकीचे पत्रे मिळाल्या प्रकरणी जीआरपी हरिद्वार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.