ETV Bharat / bharat

इंडिया आघाडीचा व्हीव्हीपॅटवर सवाल; निवडणूक आयोगाला जयराम रमेश यांचं पत्र - व्हीव्हीपॅटवर चर्चा

Jairam Ramesh letter to CEC : 'इंडिया' आघाडीची 19 डिसेंबर 2023 ला दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर व्हीव्हीपॅटबाबत 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी शंका उपस्थित केली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.

Jairam Ramesh letter to CEC
संग्रहित छायाचित्र
author img

By ANI

Published : Jan 2, 2024, 2:22 PM IST

नवी दिल्ली Jairam Ramesh letter to CEC : ईव्हीएम मशीनच्या वापरावरुन विरोधकांनी नेहमीच भाजपावर हल्लाबोल केला. नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपानं चांगलं यश मिळवलं. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांनी भाजपावर निशाना साधला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मंगळवारी भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी केली. 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांचं शिष्टमंडळ व्हीव्हीपॅटवर चर्चा करण्यासाठी ही भेट घेणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

निवडणूक आयोगाची मागितली वेळ : 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी भारतीय निवडणूक आयोगाची भेट मागितली आहे. इंडिया आघाडीच्या 3 ते 4 सदस्यांच्या शिष्टमंडळाला तुमची भेट हवी असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमबाबत 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांना शंका आहेत. त्यासाठी आम्ही तुमची भेट मागितल्याचं या पत्रात जयराम रमेश यांनी नमूद केलं आहे. विरोधकांनी अनेकदा पत्र आणि मेमोरँडम देऊनही निवडणूक आयोग शिष्टमंडळाला कोणतीही भेट देत नाही, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगानं शंका दूर केल्या नाहीत : जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाकडं पत्र लिहिलं असून यात 2 ऑक्टोबर 2023 ला वकिलामार्फत पत्र पाठवल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर 23 ऑगस्ट 2023 च्या निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणात कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत 'इडिया' आघाडीच्या शिष्टमंडळानं 20 डिसेंबर 2023 ला पुन्हा भेटीची वेळ मागितली होती. मात्र निवडणूक आयोगानं कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी : इंडिया आघाडीची 19 डिसेंबरला बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत विरोधकांनी वेगवेगळे ठराव केले. या ठरावात ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर विरोधकांना शंका आहे. त्यामुळं 'इंडिया' आघाडीनं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. व्हीव्हीपॅटमध्ये पडणारी स्लिप मतदारांकडं जावी, त्यानंतर ती पडताळून पाहण्याची संधी मिळेल. त्यासह व्हीव्हीपॅटच्या स्लिपची 100 टक्के मोजणी व्हावी, अशी मागणीही यावेळी या पत्रातून करण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. Sharad Pawar On EVM : ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास मत नेहमीच भाजपला जाते, विरोधकांनी 'हे' उपस्थित केले प्रश्न
  2. Mayawati On EVM : ईव्हीएम मुद्द्यावरुन मायावतींचे पुन्हा रडगाणे, म्हणाल्या...
  3. 'हा तर ईव्हीएम आदेश', 4 राज्यांच्या निकालावर बोलताना संजय राऊत भडकले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.