ETV Bharat / bharat

Kulgam Gunfight : दक्षिण काश्मिरात सुरक्षा दल, दहशतवाद्यांमध्ये चकमक.. अतिरेक्याला कंठस्नान, पोलिस शहीद

author img

By

Published : Jan 12, 2022, 11:27 PM IST

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील ( Kulgam District South Kashmir ) परिवान गावात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात आले असून, एक पोलीस कर्मचारी शहीद झाला ( Terorrist Killed Cop Died In Kulgam Gunfight ) आहे.

दक्षिण काश्मिरात सुरक्षा दल, दहशतवाद्यांमध्ये चकमक

श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) : दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील ( Kulgam District South Kashmir ) परिवान गावात लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यामध्ये जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित एक अतिरेकी ठार झाला. यावेळी अतिरेक्यांशी लढताना जम्मू आणि काश्मीर पोलिस दलातील एक पोलीस कर्मचारी शहीद ( Terorrist Killed Cop Died In Kulgam Gunfight ) झाले. तर बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरु असलेल्या या चकमकीत तीन सैनिक आणि दोन नागरिक जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

'एक अतिरेकी मारला गेला आहे. दुर्दैवाने, दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू झालेल्या गोळीबारात आमचा एक पोलीस कर्मचारी रोहित कुमार चिबचा मृत्यू झाला,' असे पोलिस महानिरीक्षक (काश्मीर झोन) विजय कुमार यांनी सांगितले.

'दोन नागरिकांसह लष्कराच्या ३४ RR चे तीन जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सध्या चकमक सुरू आहे. ऑपरेशन संपल्यानंतर अधिक तपशील शेअर केला जाईल,' असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस, लष्कराच्या ३४ आरआर आणि सीआरपीएफच्या १८ बीएनच्या संयुक्त पथकाने परिसरात घेराबंदी करून शोधमोहीम सुरू केली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'जेव्हा टीम संशयित जागेच्या दिशेने पोहोचली तेव्हा लपलेल्या अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ज्यामुळे मोठी चकमक उडाली.'

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सध्या गोळीबार सुरू आहे. सूत्रांनुसार, दोन दहशतवादी या परिसरात लपले आहेत.' विशेष म्हणजे, जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी विविध कारवायांमध्ये सुरक्षा दलांनी आतापर्यंत १५ दहशतवाद्यांना ठार केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.