हैदराबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्थाच्या (इस्रो) महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेने आता महत्त्वाचा टप्पा गाठलाय. चांद्रयान-3 ने शुक्रवारी लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा (LPDC) वापरून चंद्राचे मनमोहक व्हिडिओ आणि प्रतिमा जारी केल्या. चांद्रयान-3 च्या लँडर मॉड्यूलवर बसवलेल्या कॅमेऱ्यांनी ही छायाचित्रे टिपली आहेत.
-
Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
View from the Lander Imager (LI) Camera-1
on August 17, 2023
just after the separation of the Lander Module from the Propulsion Module #Chandrayaan_3 #Ch3 pic.twitter.com/abPIyEn1Ad
">Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 18, 2023
View from the Lander Imager (LI) Camera-1
on August 17, 2023
just after the separation of the Lander Module from the Propulsion Module #Chandrayaan_3 #Ch3 pic.twitter.com/abPIyEn1AdChandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 18, 2023
View from the Lander Imager (LI) Camera-1
on August 17, 2023
just after the separation of the Lander Module from the Propulsion Module #Chandrayaan_3 #Ch3 pic.twitter.com/abPIyEn1Ad
५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता : १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलेल्या चांद्रयान-3 ने ५ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. २०१९ मध्ये चांद्रयान-2 च्या अयशस्वी लँडिंगनंतर इस्रोचे हे अत्यंत महत्त्वाकांक्षी मिशन आहे. चांद्रयानाचे प्राथमिक उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर सुरक्षितपणे उतरवणे आणि इन-सीटू रासायनिक विश्लेषण करणे हे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर आणि रोव्हर पोहोचवून हे साध्य केले जाईल.
-
Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🌖 as captured by the
Lander Position Detection Camera (LPDC)
on August 15, 2023#Chandrayaan_3#Ch3 pic.twitter.com/nGgayU1QUS
">Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 18, 2023
🌖 as captured by the
Lander Position Detection Camera (LPDC)
on August 15, 2023#Chandrayaan_3#Ch3 pic.twitter.com/nGgayU1QUSChandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 18, 2023
🌖 as captured by the
Lander Position Detection Camera (LPDC)
on August 15, 2023#Chandrayaan_3#Ch3 pic.twitter.com/nGgayU1QUS
२३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल : लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे १०० किमी उंचीवरून चंद्रावर उतरेल. सॉफ्ट लँडिंगनंतर, सहाचाकी रोव्हर बाहेर येईल आणि तो चंद्राच्या पृष्ठभागावर एक चंद्र दिवसाच्या कालावधीसाठी प्रयोग करेल. हे १४ पृथ्वी दिवसांच्या बरोबरीचे आहे. इंडियन स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) नुसार, लँडर २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. रोव्हरला घेऊन लँडर विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील.
तर असे करणारा भारत केवळ चौथा देश ठरेल : जर चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाले, तर भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा केवळ चौथा देश ठरेल. यापूर्वी ISRO ने २२ जुलै २०१९ रोजी श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-2 प्रक्षेपित केले होते. ६ सप्टेंबर २०१९ रोजी ते सॉफ्ट लँडिंग करणार होते. मात्र, चंद्रावर उतरण्याच्या तीन मिनिटे आधी इस्रोचा विक्रमशी संपर्क तुटला होता.
हेही वाचा :