ETV Bharat / bharat

Aditya L1 Mission News : चंद्रानंतर भारताची लवकरच सुर्यावर स्वारी, इस्रोच्या अध्यक्षांनी दिली महत्त्वाची माहिती

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 8:27 AM IST

इस्रोनं चंद्रयान 3 मोहीम यशस्वी केल्यानंतर आता सुर्याचा अभ्यास करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. इस्रो सप्टेंबर महिन्यात सुर्याचा अभ्यास करण्यासाठी मोहीम लाँच करणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिली आहे.

Aditya L1 Mission
सांकेतिक फोटो

बंगळुरू : चंद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचं जगभरात कौतुक होत आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. त्यामुळे भारताला आता चंद्राबाबतची माहिती शोधण्यास मदत होणार आहे. मात्र, चंद्रयान 3 यशस्वी झाल्यानंतर लगेच इस्रोनं आपला मोर्चा सुर्याकडं वळविला आहे. इस्रो सप्टेंबर महिन्यात सुर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल1 ही मोहीम लाँच करणार असल्याचं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

काय आहे आदित्य एल1 मोहीम : आदित्य एल1 ही सुर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ अधारित वेधशाळा असणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आदित्य एल1 मोहीम लाँच करण्यात येणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी बुधवारी दिली आहे. या योजनेचं काम सुरळीत सुरु असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

एल1 पॉईंटपर्यंत जाण्यास लागणार 120 दिवस : आदित्य एल1 ही सुर्याचा अभ्यास करणारी वेधशाळा आहे. या वेधशाळेत सुर्याच्या संशोधनाबाबत अभ्यास सुरू आहे. आतापर्यंत वेधशाळेचं काम सुरळीत सुरू आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही मोहीम लाँच करण्यात येणार असल्याचं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं. या मोहिमेतील उपग्रहाचं प्रक्षेपण एका लंबवर्तुळाकार कक्षेत जाणार आहे. त्यानंतर ते एल पॉईंटपर्यंत प्रवास करेल. मात्र, एल पॉईंटपर्यंत प्रवास करायला उपग्रहाला 120 दिवस लागणार असल्याचंही एस सोमनाथ यांनी यावेळी सांगितलं. यूआर राव सॅटेलाईट सेंटर येथे तयार करण्यात आलेला उपग्रह SDSC-SHAR श्रीहरीकोटा इथं पोहोचल्याची माहिती इस्रोनं ट्विट करत दिली आहे.

चंद्रयान 3 यशस्वी झाल्यानं उत्साह : भारताचं चंद्रयान 3 चंद्रावर यशस्वी पोहोचल्यानं इस्रोच्या शास्त्रज्ञांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. त्यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांचं मोठ कौतुक होत आहे. इस्रोची चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानं आता शास्त्रज्ञ पुढील संशोधनाच्या कामाला लागले आहेत. त्यामुळेच आता सुर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल1 ही मोहीम लवकरच लाँच करण्यात येणार आहे. ( ANI )

हेही वाचा -

  1. भारताची 'चंद्रक्रांती'! Chandrayaan 3 चे चंद्रावर यशस्वी लॅंडिग
  2. Chandrayaan 3 Landing: भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठा दिवस; चंद्रयान करणार चंद्रावर लँडिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.