ETV Bharat / bharat

इस्रोच्या साऊंडींग रॉकेट RH-60 चे यशस्वी प्रक्षेपण

'न्युट्रल विंड आणि प्लाझ्मा गतिशीलतेतील बदलांचा अभ्यास करण्यासाठी श्रीहरीकोटा रेंजमधून साऊंडींग रॉकेट RH-60 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले' असे ट्विट इस्रोने केले आहे.

इस्रोच्या साऊंडींग रॉकेट RH-60 चे यशस्वी प्रक्षेपण
इस्रोच्या साऊंडींग रॉकेट RH-60 चे यशस्वी प्रक्षेपण
author img

By

Published : Mar 13, 2021, 12:36 PM IST

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने शुक्रवारी साऊंडींग रॉकेट RH-60 चे यशस्वी प्रक्षेपण केले. न्युट्रल विंड आणि प्लाझ्मा गतिशीलतेतील व्यावहारीक बदलांचा अभ्यास करण्यासाठी या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.

ट्विट करून इस्रोची माहिती

इस्रोने ट्विट करून याची माहिती दिली आहे. 'न्युट्रल विंड आणि प्लाझ्मा गतिशीलतेतील बदलांचा अभ्यास करण्यासाठी श्रीहरीकोटा रेंजमधून साऊंडींग रॉकेट RH-60 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले' असे ट्विट इस्रोने केले आहे. वरच्या वातावरणाचा अभ्यास आणि अंतराळ संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या रॉकेटपैकी हे एक रॉकेट आहे.

ट्विट करून इस्रोने याची माहिती दिली आहे
ट्विट करून इस्रोने याची माहिती दिली आहे

पीएसएलव्ही सी-21 चे केले होते प्रक्षेपण

२८ फेब्रुवारी रोजी इस्रोने 2021 मधील पहिली मोहीम राबविताना पीएसएलव्ही सी-51 चे यशस्वी प्रक्षेपण केले होते. या प्रक्षेपणाच्या माध्यतमातून ब्राझीलचा 'अमेझॉनिया-१' आणि तीन भारतीय कृत्रिम उपग्रह इस्रोने अवकाशात पाठविले होते. विशेष म्हणजे, हे सर्व उपग्रह भारतातील नवख्या कंपन्यांनी तयार केले आहेत.

ब्राझीलचा पहिलाच स्वतंत्र उपग्रह..

'अमेझॉनिया-१' हा ब्राझीलने स्वतंत्रपणे तयार केलेला पहिला अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाईट आहे. यासोबत, भारताचे 'आनंद', 'सतीश धवन' आणि 'युनिटीसॅट' हे तीन उपग्रहही अंतराळात पाठविण्यात आले. आनंद उपग्रहाची निर्मिती भारतातील पिक्सेल (Pixxel) या कंपनीने केली आहे. तर, सतीश धवन या उपग्रहाची निर्मिती चेन्नईमधील स्पेस किड्झ (Space Kidz) या कंपनीने केली आहे.

तीन महाविद्यालयांनी बनवलेला 'युनिटीसॅट'

'युनिटीसॅट' हा उपग्रह जेप्पियार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, श्रीपेरुमुपुदुर; जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर; आणि श्री शक्ती इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोईंबतूर या तीन महाविद्यालयांनी तयार केलेल्या उपग्रहांचा मिळून तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा - इस्रोची २०२१मधील पहिली मोहीम; भारत-ब्राझीलच्या उपग्रहांचे करणार प्रक्षेपण..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.