ETV Bharat / bharat

ISRO : इस्त्रोची दिवाळी.. सर्वात वजनदार 36 उपग्रहांचे केले प्रक्षेपण

author img

By

Published : Oct 23, 2022, 6:42 AM IST

Updated : Oct 23, 2022, 7:06 AM IST

इस्त्रोने (ISRO launches Mission) एलव्हीएम थ्री- एम 2 /वन वेब इंडिया -1 मिशन (LVM3 M2 OneWeb India 1 Mission) मध्यरात्री लाँच (Satish Dhawan Space Centre Sriharikota) केले.

ISRO
ISRO

श्रीहरीकोट्टा ( आंध्रप्रदेश ) : दिवाळीत आपण रॉकेट उडवितो. पण, इस्त्रोने ऐन दिवाळीत खरेखुरे रॉकेट प्रक्षेपित करून दिवाळीसारखी आनंदाची स्थिती अनुभवली. इस्त्रोने एलव्हीएम थ्री- एम 2 /वन वेब इंडिया -1 मिशन मध्यरात्री लाँच (ISRO launches Mission) केले. सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा (Satish Dhawan Space Centre Sriharikota) येथून लंडनस्थित कंपनी, आणि न्यूस्पेस इंडिया लिमिटेडचा हा अंतराळ विभागांतर्गत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने बनवलेले सर्वात वजनदार रॉकेट, रविवारी श्रीहरिकोटा स्पेसपोर्टमधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात आले. इस्रोने ब्रिटनमधील एका ग्राहकांसाठी 36 ब्रॉडबँड कम्युनिकेशन उपग्रह लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये प्रक्षेपित केले आहे. यापूर्वी इस्त्रोच्या एलव्हीएम थ्रीवर वन वेब एलईओ उपग्रह (LVM3 M2 OneWeb India 1 Mission) प्रक्षेपणासाठी दोन प्रक्षेपण सेवा करारांना सहमती दिली होती.

डेटा थोड्या वेळाने येईल इस्रोचे अध्यक्ष डॉ एस. सोमनाथ म्हणाले, आम्ही आधीच दिवाळी) उत्सव सुरू केला आहे. 36 पैकी 16 उपग्रह सुरक्षितपणे वेगळे झाले आहेत. उर्वरित 20 उपग्रह वेगळे केले जातील. डेटा थोड्या वेळाने येईल आणि निरीक्षणाचे ऑपरेशन सुरू असल्याचे इस्रोचे अध्यक्ष सांगितले. हे एक ऐतिहासिक मिशन आहे. पंतप्रधान मोदींच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले आहे. कारण एलएम M3 व्यावसायिक बाजारपेठेत यावे. एनएसआयएल अग्रभागी आहे. व्यावसायिक क्षेत्राचा शोध आणि विस्तार करण्यासाठी आमची प्रक्षेपण वाहने कार्यान्वित आहेत, असे इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितले.

Last Updated : Oct 23, 2022, 7:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.