लडाख - 31 ऑगस्ट रोजी, 114 हेलिकॉप्टर युनिटला मार्का व्हॅलीजवळील निमलिंग कॅम्पमधून केसव्हॅकसाठी कॉल आला. अतार कहाना, या एका इस्रायली नागरिकाला उलट्या आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्रास होत होता. त्यावेळी Flt Cdr 114 HU, Wg Cdr आशिष कपूर आणि Flt लेफ्टनंट रिदम मेहरा लगेच बचावकार्यासाठी काही मिनिटांतच रवाना झाले.
सर्वात जवळच्या मार्गाने केसव्हॅक हेलिकॉप्टर 20 मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. त्यांननी 16800 फूट उंचीवर असलेल्या गोंगमारू-ला खिंडीत त्याला पाहिले.
लगच त्याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर खाली उतरुन त्याला हेलिकॉप्टरमध्ये घेण्यात आले.
एअरफोर्स स्टेशन लेह येथे 1 तासाच्या आत अतार कहाना याला आणण्यात आले. तसेच त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.
हेही वाचा - गोंडा जिल्ह्यात दलित जोडप्याने कोर्टात विवाह केल्यानंतर सरपंचाने घराला लावले कुलूप