राजकोट Israel Palestine Conflict : हमास आणि इस्रायलमध्ये जोरदार युद्ध भडकलं आहे. त्यामुळे अनेक भारतीय नागरिक इस्रायलमध्ये अडकले आहेत. तर काही नागरिकांना हमासच्या ( Israel Gaza Conflict ) दहशतवाद्यांनी ओलीस ठेवल्यानं संयुक्त राष्ट्र संघानं चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान राजकोटच्या सोनल गेडीयानं सरकार आमच्या सोबत असल्यानं चिंता करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सोनल गेल्या आठ वर्षापासून इस्रायलमध्ये राहात आहे. मात्र सोनल गेडीयाच्या राजकोटमधील जामनगरमध्ये राहणाऱ्या आई वडिलांनी हे युद्ध थांबायला हवं, अशी प्रार्थना केली आहे.
सोनल गेडीया आठ वर्षापासून इस्रायलमध्ये : जामनगरची सोनल गेडीया ही तरुणी गेल्या आठ वर्षापासून इस्रायलमध्ये राहात आहे. सोनल गेडीया इस्रायलला नोकरी करत आहे. मात्र सध्या हमासनं केलेल्या हल्ल्यामुळे सोनल गेडीयाचे आई वडील आणि नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत. सोनल गेडीयाच्या आई वडिलांनी ईश्वराकडं हे युद्ध थांबण्यासाठी प्रार्थना सुरू केली आहे. मात्र याबाबत सोनल गेडीया ही चिंता करण्याचं कारण नसल्याचं सांगत आहे.
सरकार आमच्या सोबत, चिंता करण्याचं कारण नाही : जामनगरच्या सोनल गेडीयानं तिच्या आई वडिलांना चिंता करण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सरकारनं आम्हाला घरी राहण्याच्या सूचना दिल्याचं सोनल गेडीयानं तिच्या आई वडिलांना सांगितलं आहे. आम्ही घरी राहिलो, तर सरकार आमची काळजी घेईल. मात्र आम्ही बाहेर पडलो, तर युद्धात अडकू, असंही इस्रायल सरकारनं स्पष्ट सूचना दिल्याचं सोनल गेडीयानं सांगितलं. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही, इस्रायल सरकार आमच्या सोबत असल्याचं सोनल गेडीयानं तिच्या आई वडिलांना सांगितलं आहे.
मुलीनं पाठवलेल्या व्हिडिओवरुन समजते परिस्थिती : सोनल गेडीया ही तरुणी इस्रायलमध्ये अडकल्यानं तिचे आई वडील मोठे चिंताक्रांत झाले आहेत. याबाबत सोनल गेडीयाची आई निर्मलाबेन यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारलं असता, त्यांनी चिंता करण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट केलं. माझ्या मुलीला इस्रायल सरकारनं घरी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ती घरी सुरक्षित आहे. इस्रायल सरकार त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत आहे. भारत सरकारनंही इस्रायलला समर्थन दिलं आहे. त्यामुळे मोदी सरकारनं इस्रायलला पाठिंबा दिल्यानं तर काळजी करण्याचं कारण नाही. सोनल तिथले व्हिडिओ पाठवत असल्यानं तिथली परिस्थिती समजत असल्याचं निर्मलाबेन यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :