ETV Bharat / bharat

आयएसआयकडून सैन्य अधिकाऱ्याला हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न, पण घडले भलतेच! - हनीट्रॅप न्यूज

दिल्ली पोलिसांनी आरोपी दिलीप कुमार याला सैन्यदलाचा अधिकारी असल्याचा बनाव केल्याप्रकरणी अटक केली होती. आरोपी हा १०० हून अधिक महिलांचा ग्रुप असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपचा सदस्य होता.

ISI tries honey trappin
आयएसआयकडून हनीट्रॅपचा प्रयत्न
author img

By

Published : Jun 19, 2021, 5:37 PM IST

Updated : Jun 19, 2021, 6:21 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या आयएसआयने सैन्यदलाच्या अधिकाऱ्याला हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हनीट्रॅपमध्ये सापडलेला व्यक्ती हा तोतया अधिकारी निघाला आहे. गुप्तचर विभागाकडून या तोतया अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे.

सैन्यदलातील गुप्तचर अधिकारी, इंटेल ब्युरो आणि दिल्लीच्या स्पेशल सेलचे अधिकारी हे ग्रेटर कैलाश पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी पोहोचले. त्यांनी सैन्यदलाच्या तोतया कॅप्टनची चौकशी केली आहे. आरोपीच नाव दिलीप कुमार (४०) असून तो नवी दिल्लीमधील मोहन गार्डनमधील रहिवाशी आहे. पोलिसांमधील सुत्राच्या माहितीनुसार पाकिस्तानमधील आयएसआयला तोतया अधिकारी हा खरा वाटला. त्यामुळे त्यांनी या व्यक्तीला हनी ट्रॅपमध्ये अडकाविण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा-दोन बायका फजिती ऐका.. नवरा २ बायकांसोबत राहणार ३-३ दिवस, रविवारी आईवडिलांसोबत

यापूर्वीही अधिकारी असल्याचा आरोपीने केला होता बनाव-

यापूर्वीही दिल्ली पोलिसांनी आरोपी दिलीप कुमार याला सैन्यदलाचा अधिकारी असल्याचा बनाव केल्याप्रकरणी अटक केली होती. आरोपी हा १०० हून अधिक महिलांचा ग्रुप असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपचा सदस्य होता. तसेच आरोपी हा इतर देशांमध्ये असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकाशीही संपर्कात होता.

हेही वाचा-‘फ्लाईंग शिख’ मिल्खा सिंग यांच्या निधनावर मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली...

सैन्यदलाचा अधिकारी असल्याचे भासवित महिलांना करायचा आकर्षित-

पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलमध्ये तपासणी केला असता आरोपी हा आंतरराष्ट्रीय क्रमांकावर व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने कॅप्टन शेखर असल्याचे सांगत समाज माध्यमांमध्ये महिला आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तोतया कॅप्टनने विदेशातील व्यक्तींशा व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. याबाबत सैन्यदलाकडून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, यापूर्वी आयएसआयने सैन्यदलातील गोपनीय माहिती मिळविण्यासाठी सैन्यदलातील अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविल्याचे प्रकार समोर आले होते.

Last Updated : Jun 19, 2021, 6:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.