चंदौली (उत्तर प्रदेश) : इरफानचे वडील सलाउद्दीन यांनी सांगितले की, तो सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थी होता. त्याचे प्राथमिक शिक्षण एसबी पब्लिक स्कूल सकलदिहा येथे झाले तर माध्यमिक शिक्षण एलटी मॉडेल स्कूल सकलदिहा येथून झाले. कालांतराने इरफानची संस्कृतची आवड वाढली आणि त्याने संस्कृत शाळेत प्रवेश घेतला. त्याचा कल पाहून वडिलांनीही त्याला संस्कृत शाळेत प्रवेश दिला. यामुळे अनेक वर्षांमध्ये इरफान आणि त्याच्या वडिलांना त्यांच्या समाजातील लोकांकडून अनेक वेळा विरोधाला सामोरे जावे लागले. परंतु, तरीही इरफानने आपले ध्येय सोडले नाही. त्याने संस्कृत भाषेत शिक्षण सुरूच ठेवले.
इरफान सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार : राज्यात प्रथम आलेला इरफान असारी हा बेगम आणि सलाउद्दीन यांचा एकुलता एक मुलगा आहे, जो सकलदिहा तहसीलमधील दिंडासपूरचा रहिवासी आहे. शाळेच्या व्यवस्थापकाने सांगितले की, इरफान सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार आहे. 3 मे रोजी उत्तर प्रदेश संस्कृत शिक्षा परिषद लखनौ बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये प्रभुपूर चंदौली येथील संपूर्णानंद संस्कृत उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्याने उत्तर माध्यमिकच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत उत्तर प्रदेशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तो 82.72% गुण मिळवून राज्यात अव्वल ठरला आहे.
इरफानने या यशाचे श्रेय आपले पालक व शिक्षकांना दिले : शिक्षणाला कोणताही धर्म नसतो. कोणत्याही धर्माचे असले तरी शिक्षण घेणे हे तुमचा अधिकार आहे. तसेच, शिक्षण घेताना याच विषयाचे घ्यावे किंवा त्या धर्मातील व्यक्तीनेच घ्यावे असे नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशातील चंदौली येथील रहिवासी असलेल्या इरफानने उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षण परिषदेच्या मध्यवर्ती परीक्षेत राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे त्याचा सर्वत्रच गुणगौरव होत आहे. तो मुस्लिम धर्माचा असल्याने त्याने हे शिक्षण घेऊ नये किंवा या विषयात त्याने इतके शिक्षण घेऊ नये असे मत असणारेही लोक होते. मात्र, या कोणत्याही गोष्टीला फार महत्व न देता इरफानने आपले शिक्षण पुर्ण केले आहे हे जास्त महत्वाचे आहे. दरम्यान, इरफानने या यशाचे श्रेय आपले पालक व शिक्षकांना दिले आहे.
हेही वाचा : मातोश्रीवर खोके पोहोचावे यासाठी ठाकरेंचा रिफायनरीला विरोध, समर्थन मोर्चात राणेंची सडकून टिका