ETV Bharat / bharat

IPL Media Rights Auction : आयपीएल मीडिया राइट्समधून बीसीसीआय मालामाल; कमावले तब्बल 48390 कोटी, वाचा संपूर्ण तपशील - बीसीसीआय सचिव जय शाह

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी संध्याकाळी जाहीर केले की, आयपीएल 2023-27 साठीचे टीव्ही हक्क स्टार डिजिटल राइट्स वायाकॉम (रिलायन्स) ( TV rights star Digital Rights Viacom ) कडे असतील. पाच वर्षांसाठी एकूण चार पॅकेजेसची बोली सुमारे 50 हजार कोटी रुपयांवर (48,390 कोटी) पोहोचली.

IPL
IPL
author img

By

Published : Jun 14, 2022, 10:08 PM IST

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मीडिया हक्कांचा तीन दिवस चाललेला लिलाव ( IPL Media Rights Auction ) मंगळवारी संपला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी संध्याकाळी जाहीर केले की, आयपीएल 2023-27 साठीचे टीव्ही हक्क स्टार डिजिटल राइट्स वायाकॉम (रिलायन्स) कडे असतील. पाच वर्षांसाठी एकूण चार पॅकेजेसची बोली सुमारे 50 हजार कोटी रुपयांवर (48,390 कोटी) पोहोचली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह ( BCCI Secretary Jai Shah ) यांनीही ट्विट करून वायाकॉमचे अभिनंदन केले असून लिलावात बोली लावणाऱ्यांचे आभार मानले आहेत. जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'वायकॉम-18 ने 23758 कोटी रुपयांना डिजिटल अधिकार विकत घेतले आहेत. भारताने डिजिटल क्रांती पाहिली आहे आणि या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. डिजिटलने आपला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, म्हणूनच खेळाच्या वाढीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे.

  • I congratulate Viacome18 for winning Aus, SA, UK,
    Times have got MENA & US, who win the Rest of the World Rights. The IPL is as popular outside India as it is here and
    the viewers will be able to enjoy top-class cricket.

    — Jay Shah (@JayShah) June 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वायाकॉम-18 ने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि युनायटेड किंग्डमचे हक्कही विकत घेतल्याची माहिती जय शाह यांनी दिली आहे. टाइम्स इंटरनेटने मेना (मध्य पूर्व) आणि अमेरिकेचे सर्व हक्क विकत घेतले आहेत, तर टाईम्सकडे इतर देशांचेही हक्क असतील. बीसीसीआय सचिव म्हणाले की, जगभरातील क्रिकेटप्रेमींना आयपीएलचे अव्वल दर्जाचे क्रिकेट पाहायला मिळेल.

जय शाह यांनी लिहिले की, या लिलावात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो, बीसीसीआय आपल्या बाजूने सर्वतोपरी मदत आणि समर्थन करेल. या लिलावातून बीसीसीआयला जे काही उत्पन्न मिळेल ते देशांतर्गत क्रिकेटची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी वापरली जाईल. जेणेकरून चाहत्यांना क्रिकेट पाहण्याचा आनंद घेता येईल. जय शाह पुढे म्हणाले की, आता राज्य संघटना, आयपीएल फ्रँचायझींनी एकत्र येण्याची आणि चाहत्यांना आयपीएलचा उत्तम अनुभव देण्याची वेळ आली आहे.

कोणाला काय मिळाले?

आयपीएल 2023-27 मीडिया अधिकार एकूण बोली – 48390 कोटी

• पॅकेज ए (भारतातील टीव्ही हक्क) - 23575 कोटी, स्टार

• पॅकेज बी (भारतातील डिजिटल अधिकार) - 20500 कोटी, वायाकॉम-18

• पॅकेज सी (भारतातील विशेष 18 सामने) - 3258 कोटी, वायाकॉम-18

• पॅकेज डी (परदेशात हक्क) - 1057 कोटी, वायाकॉम-18 आणि टाइम्स इंटरनेट

इंडियन प्रीमियर लीगची 2008 मध्ये सुरूवात झाली होती. तेव्हापासून ही लगातार सुरू आहे. आज, जेव्हा त्याचे 15 हंगाम पूर्ण झाले आहेत, तेव्हा आयपीएल लीग इतकी मोठी झाली आहे की, जगातील दुसऱ्या सर्वात महागड्या लीगमध्ये गणना केली जात आहे. एका आयपीएल सामन्यातून सुमारे 110 कोटी रुपयांची कमाई होत आहे, जे केवळ मीडिया हक्कांमधून मिळते.

हेही वाचा - Ind Vs Sa 3rd T 20 : ऋतुराज आणि इशानच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताचे दक्षिण आफ्रिकेला 180 धावांचे लक्ष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.