ETV Bharat / bharat

आंतरराज्य गांजा तस्करी टोळीचा पर्दाफाश, 360 किलो गांजा सव्वा कोटीची मालमत्ता जप्त, 6 जणांना अटक, महाराष्ट्रातील दोघांचा समावेश - ganja smuggling racket busted

हैदराबाद राचकोंडा पोलिसांनी आंतरराज्य गांजा तस्करी टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी 360 किलो गांजा सव्वा कोटीची मालमत्ता जप्त केली. या कारवाईत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील दोन जण महाराष्ट्रातील आहेत.

आंतरराज्य गांजा तस्करी टोळीचा पर्दाफाश
आंतरराज्य गांजा तस्करी टोळीचा पर्दाफाश
author img

By

Published : Sep 12, 2022, 3:54 PM IST

हैदराबाद - राचकोंडा पोलिसांनी अंमली पदार्थाचा तस्करी करणारी 6 जणांची आंतरराज्य टोळी पकडली आहे (ganja smuggling racket busted). त्यांच्याकडून 360 किलो गांजा जप्त करण्यात आला. तसेच सुमारे रु. 1.2 कोटी रुपयांचे गाड्यांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले.

राचकोंडा पोलिसांनी काल दि 11 रोजी रात्री 10 वाजता गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई केली. विशेष ऑपरेशन टीम, मलकाजगिरी झोनच्या चौतुप्पल पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली (malkajgiri ZONE 6 arrested Seized 360 kGS OF GANJA). यामध्ये 6 आंतरराज्य अमली पदार्थ तस्करांना पकडले त्यामध्ये कानुमारेड्डी पवन कुमार, मंदा सुधीर बाबू, कोटिपल्ली लोवा राज, मिलकुला तेजा, पवन मनोहर तांबोळे आणि संतोष घंटे यांचा समावेश आहे. ते गांजा खरेदी करुन वैझाग ते हैदराबाद मार्गे महाराष्ट्रात नेत होते (racket busted by Hyderabad Rachakonda police).

यातील आरोपी कनुमरेड्डी पवन कुमार याला यापूर्वी शमशाबाद येथे अशाच एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती, त्याला गांजाची वाहतूक, घ्यायचे मार्ग आणि पोलिस तपासणी टाळून इच्छित स्थळी पोहोचणे याची माहिती आहे. इतरांना व्यवस्थित प्लॅन करुन गांजा महाराष्ट्रात पाठवण्याची योजना आखली होती. प्रत्येकाला त्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

पोलिसांना या तस्करीचा सुगावा लागले. त्यांनी 11 तारखेला रात्री 10 च्या सुमारास, SOT मलकाजगिरी झोन ​​आणि चौतुप्पल पोलिसांनी 6 आरोपी, 3 चारचाकी वाहनांसह 360 किलो अवैध गांजासह पकडले. त्यांच्याकडून 8 मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. हा एकूण माल सुमारे 1.2 कोटी रुपयांचा आहे.

ही कारवाई राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश एम भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली एसओटी व्ही. अशोक रेड्डी, पोलीस निरीक्षक, एसओटी, मलकाजगिरी झोन, एन. श्रीनिवास, पोलीस निरीक्षक, चौतुप्पल पोलीस स्टेशन आणि उपनिरीक्षक श्री पी. वासुदेव, एसओटीचे जी. रघु रामुडू विशेष कार्य पथकाचे पोलीस कर्मचारी यांनी केली. यापूर्वीही हैदराबादच्या राचकोंडा पोलिसांनी अशीच कारवाई करत मोठ्या प्रमाणावर गांजा पकडला होता. या कारवाईमुळे राज्यात तस्करी करणाऱ्यांवर जरब बसणार आहे. व्यसनाधिनतेपासून तरुण पिढीचा यातून बचाव होण्यास मदत होईल.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.