ETV Bharat / bharat

International Yoga Day 2021 : जाणून घ्या 21 जूनलाच का साजरा केला जातो योग दिवस!

जागतिक योग दिन नेमका कधीपासून साजरा केला जाऊ लागला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची योग दिनाची थीम काय आहे? जाणून घेऊया...

author img

By

Published : Jun 21, 2021, 7:07 AM IST

योग दिवस
योग दिवस

नवी दिल्ली - योग दिवस प्रत्येक वर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. सन 2015 पासूनच, जागतिक स्तरावर उत्सव साजरा करण्यास सुरवात केली गेली. चांगल्या आरोग्यासाठी योग करणे खूप महत्वाचे आहे. योग हा शब्द संस्कृतमधील आहे. योगाचा इतिहास हा हजारो वर्ष जुना असल्याचे म्हटलं जातं. शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय योग फेडरेशनच्या माहितीनुसार सध्या जगभरात 300 दशलक्ष लोक योगाभ्यास किंवा योगासने करतात. यंदा योग दिनाच्या पार्श्वभूमीवर काही योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाची थीम काय?

यावर्षी आपण सातवा योग दिवस साजरा करत आहोत. दरवर्षी योग दिनासाठी एक विशेष विषय (थीम) नेमण्यात येतो. यावर्षीच्या योग दिनाचा विषय आहे, 'योग फॉर वेलनेस'. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा विषय निवडण्यात आला आहे. यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमामधून पंतप्रधान सकाळी साडेसहा वाजता देशाला संबोधित करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नरेंद्र मोदींनी मांडली योग दिनाची संकल्पना -

27 सप्टेंबर 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना मांडली. योग हा केवळ एक व्यायामप्रकार नसून, आपल्या 'स्व'चा शोध घेण्याचा, मनःशांती प्राप्त करण्याचा आणि मानसिक व शारिरीक संतुलन राखण्याचा एक मार्ग आहे, असे ते म्हणाले होते. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

पहिला योग दिवस -

आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2015 रोजी जगभरात प्रथमच साजरा करण्यात आला. ज्यामध्ये सुमारे 36,000 लोकांनी भाग घेतला. याव्यतिरिक्त, सुमारे 84 देशांच्या प्रतिनिधींनी 21 योगाचे आसन केले. 2015 पासून दरवर्षी योग दिन साजरा केला जातो.

21 जूनच का?

पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे 21 जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. 21 जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे.

कोरोना काळात योग दिन -

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर जगभर आहे. वैद्यकीय तज्ञ, सरकार, योगगुरू आणि आयुर्वेद या सर्वांनी या काळात सुरक्षित राहण्यासाठी योग करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाच्या संकटात योगासने व प्राणायाम हे योगाचे प्रकार अत्यंत प्रभावी कामगिरी बजावतात. कोरोनात उत्तम, सुदृढ आरोग्य हे रोगप्रतिकार करण्याची यशस्वी गुरुकिल्ली मानली जाते. योग, प्राणायाम, व्यायाम यातून शारीरिक व मानसिक सुदृढता वाढली जाते. प्राचीन संस्कृतीत योगाचे असलेले महत्त्व कोरोना काळात वृद्धिंगत होत आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी हवी असलेली प्रतिकारक्षमता वाढवण्याचे काम योगाच्या माध्यमातून करता येते. जगभरातून स्वीकारल्या गेलेल्या भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने केला गेला जातो.

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय योग दिन : असे असणार कार्यक्रमाचे स्वरुप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.