नवी दिल्ली : जागतिक पातळीवर आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यात येत आहे. हा दिवस भाषिक विविधतेसह सांस्कृतिक विविधतेबद्दल जागरूकता आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. विविध भाषांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे मातृभाषा धोक्यात आल्याने शिक्षणक्षेत्रही चिंतेत आहे. आज जागतिक भाषांच्या वाढत्या ट्रेंडमध्ये आता सर्वांनाच आपल्या मातृभाषेकडे नकळत दुर्लक्ष होत असल्याची जाणीव आहे. त्यामुळे आजच्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाला महत्व आले आहे.
कधी झाली होती मातृभाषा दिनाची सुरूवात : युनेस्कोने आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची सुरुवात 17 नोव्हेंबर 1999 रोजी केली. त्यानंतर 2000 मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला. मातृभाषेला असलेले धोके कोणते, त्या धोक्यापासून मातृभाषेला कसे वाचवायचे यावर जगभरातील नागरिक आणि संस्था आज मंथन करत आहेत. संपूर्ण जगात 7000 हून अधिक भाषा अस्तित्वात आहेत. त्यातील निम्म्या भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हे लक्षात घेऊन लोकांमध्ये मातृभाषेची समज वाढावी आणि मातृभाषेची व्याप्ती अधिक व्यापक पद्धतीने होण्यासाठी २१ फेब्रुवारी २००० पासून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली.
काय आहे मातृभाषा दिनाची थीम : जागतिक पातळीवर मातृभाषा दिन साजरा करण्यात येत असल्याने त्याला एक वेगळे वलय निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची वेगवेगळ्या वर्षी वेगळी थीम घेऊन साजरा करण्यात येते. यावर्षी या मातृभाषा दिनाची थीम बहुभाषीक शिक्षण शिक्षण सुधारण्यासाठी आवश्यक अशी थीम आहे. त्यामुळे यावर्षी बहुभाषीक शिक्षण पद्धतीवर भर देण्यात येणार असल्याचे वर्तवले जात आहे.
जागतिक मातृभाषा दिनी महात्मा गांधींची आठवण : आज जागतिक मातृभाषा दिनी महात्मा गांधींची आठवण येणे स्वाभाविक आहे. माणसाला त्याच्या मातृभाषेत शिक्षण मिळाले पाहिजे, असे गांधीजींचे मत होते. शिक्षण कोणत्याही भाषेत दिले जाऊ शकते, परंतु प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मातृभाषेत शिक्षण दिले पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे महात्मा गांधीजी म्हणाले होते. कदाचित आपण या जबाबदारीपासून दूर पळत आहोत. त्यामुळे आज मातृभाषेवर मोठे संकट उभे ठाकले असून, ती वाचवण्यासाठी हा दिवस साजरा करणे आपल्याला भाग पडले आहे. जर एखाद्या व्यक्तीमध्ये शिक्षणाची कमतरता असल्यास त्याला त्याच्या मातृभाषेतून शिक्षण मिळाले नसल्याचे मानले जाते. मला इंग्रजी आवडत नाही, तरीही मला इंग्रजी भाषेबद्दल आदर असल्याचे महात्मा गांधीजी म्हणायचे. मातृभाषेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी इतर भाषांशी योग्य न्याय केला तर व्यक्तीच्या सद्गुणाला सोन्यासारखेच मोल येईल. त्यामुळे संपूर्ण जगाच्या मातृभाषांचे संरक्षण होईल. मातृभाषा नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी कोणताही दिवस साजरा करण्याची गरज भासणार नाही.
हेही वाचा - International Mother Language Day 2023: मातृभाषेतूनच आपली होते खरी ओळख, तिचा करा सन्मान