ETV Bharat / bharat

International Friendship Day 2023: आंतरराष्ट्रीय मैत्री दिन आज होतोय साजरा,  जाणून घ्या इतिहास - ३० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन

आपल्या सर्वांच्या जीवनात मित्रांचे विशेष स्थान असते. मैत्री हे एक अनमोल नाते आहे, ते साजरे करण्यासाठी दरवर्षी ३० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा केला जातो. फ्रेंडशिप डे हा असा एक दिवस आहे, जेव्हा तुम्ही मित्राप्रती तुमचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करू शकता.

International Friendship Day 2023
आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
author img

By

Published : Jul 30, 2023, 9:01 AM IST

हैद्राबाद : जगातील सर्वात प्रिय नातेसंबंधांपैकी एक नाते म्हणजे मैत्री आहे. मैत्री कधीच रक्ताच्या नात्यावर अवलंबून नसते, ती फक्त विश्वास आणि प्रेम या दोन गोष्टींवर अवलंबून असते. मैत्री हे एक सुंदर नाते आहे, त्याला जात, वय, रंग यांचे बंधन नसते. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन दरवर्षी 30 जुलै रोजी साजरा केला जातो. मैत्री साजरी करणे तसेच नवीन लोकांना भेटणे आणि मित्र बनवणे या कल्पनेला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. 2011 पासून 30 जुलैला आंतरराष्ट्री मैत्री दिन साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय मैत्री दिन : 2011 मध्ये, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत मैत्री, संस्कृती, समुदाय, देश आणि लोक यांच्यातील संबंध साजरे करण्यासाठी 30 जुलैला आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केले. तरुण हे देशाचे भविष्य आहेत. हा दिवस त्यांना विविधतेचा आदर करण्यास आणि प्रत्येक गोष्टीत एकता शोधण्यास शिकवण्याच्या महत्त्वावर भर देतो, असा यामागे हेतू होता. या दिवशी, सरकारी संस्था, खाजगी संस्था आणि इतर संस्था विविध समुदाय आणि संस्कृतींमध्ये संवाद सुरू करण्यासाठी कार्यक्रम, चर्चासत्रे आणि उपक्रम आयोजित करतात. एकत्र येण्यासाठी आणि सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाचा इतिहास : 1958 मध्ये पॅराग्वे येथे प्रथम आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्यात आला होता. हा अविस्मरणीय दिवस हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक जॉयस हॉल यांनी 1930 मध्ये सुरू केला होता. मित्रांसाठी एक खास दिवस म्हणून साजरे करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाची कल्पना त्यांनी मांडली. त्यानंतर विनी द पूह यांना 1988 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या मैत्रीचे राजदूत बनवले. मैत्रीचा प्रचार करून शांततेच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी 1958 मध्ये आंतरराष्ट्रीय नागरी संघटनेने- वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेडने हा दिवस सर्वप्रथम प्रस्तावित केला होता. 2011 मध्ये झालेल्या 65 व्या संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात 30 जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून अधिकृतपणे निश्चित करण्यात आला.

हेही वाचा :

  1. International Friendship Day 2022: आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाची खासियत काय, आहे का तुम्हाला माहीत?
  2. Friendship Day: मैत्री दिनावर कोरोनाचे सावट; साहित्य विक्रीवर परिणाम, व्यावसायिक चिंताग्रस्त
  3. Friendship Day 2022 : ऑगस्टच्या पहिल्याच रविवारी फ्रेंडशिप डे का साजरा करतात? जाणून घ्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.