हैदराबाद International Day of Non-Violence : जगभरात 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो. 15 जून 2007 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेनं 2 ऑक्टोबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. भारतामध्येही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस म्हणून आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो. गांधींच्या संघर्ष आणि बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते. गांधींनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबला आणि इतरांनाही त्याचा अवलंब करायला शिकवले. ते अहिंसेचे पुजारी होते आणि 2 ऑक्टोबर रोजी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केल्या जातो.
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कसा सुरू झाला : अहिंसेच्या धोरणाद्वारे जगभर शांततेचा संदेश देण्यासाठी महात्मा गांधींच्या योगदानाचं कौतुक करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मांडलेल्या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा देण्यात आला. महासभेच्या एकूण 191 सदस्य देशांपैकी 140 हून अधिक देशांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली. मदत करणाऱ्या देशांमध्ये नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान, भूतान, आफ्रिका आणि अमेरिकेसह अनेक देश सहभागी होते.
अहिंसा म्हणजे काय? : महात्मा गांधींच्या मते, अहिंसा हे केवळ तत्वज्ञान नसून काम करण्याची एक पद्धत आहे. ते हृदयपरिवर्तनाचं साधन आहे. 'सत्य आणि अहिंसा' ही गांधीवादी विचारसरणीची दोन मूलभूत तत्त्वं आहेत. जिथं सत्य आहे तिथं देव आहे आणि तो नैतिकतेचा आधार आहे, असं गांधी मानत होते. अहिंसा म्हणजे 'प्रेम आणि उदारतेचे शिखर'. गांधींच्या मते, अहिंसावादी व्यक्ती कधीही इतर कोणाला मानसिक किंवा शारीरिक वेदना देत नाही. अहिंसा म्हणजे कोणाचंही नुकसान करण्याचा विचार न करणे, कठोर शब्दांतूनही कोणाचंही नुकसान न करणे आणि कोणत्याही जीवावर कोणत्याही परिस्थितीत, कृतीतूनही हिंसा न करणे.
महात्मा गांधी : महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. लोक गांधींना बापू, महात्मा गांधी आणि राष्ट्रपिता म्हणून ओळखतात. गांधी केवळ भारतातच नाही तर जगभरातील देशांमध्ये मानले जातात. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात गांधींनी आपले संपूर्ण योगदान दिलं होतं. जगभरातील नागरी हक्क आणि सामाजिक बदलासाठी अहिंसक चळवळींसाठी ते प्रेरणास्थान आहेत. आयुष्यभर, जाचक परिस्थिती आणि अनेक आव्हानांना तोंड देऊनही गांधींनी अहिंसा सोडली नाही आणि संपूर्ण जगाला अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा ते देत राहिले.
हेही वाचा :
- International Translation Day 2023 : 'आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन' 2023; जाणून घ्या काय आहे इतिहास आणि महत्त्व
- World Vegetarian Day 2023 : जागतिक शाकाहारी दिवस 2023; 'हे' शाहकारी पदार्थ आहेत प्रथिनांचं भांडार...
- Breast Cancer Awareness Month 2023 : 'ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ' 2023; स्तनामध्ये 'ही' लक्षणं दिसल्यास डॉक्टरांशी साधा संपर्क...