नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 152 वी जयंती आहे. महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. २ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. सत्य आणि अहिंसेबद्दल बापूंचे विचार नेहमीच भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्गदर्शन करत आले आहेत आणि पुढेही करत राहतील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन देखील दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. 15 जून 2007 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला. म्हणूनच गांधी जयंती आता जगातील इतर देशांमध्ये अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते. महात्मा गांधींना अभिवादन करण्यासह त्यांच्या कार्याचे स्मरण या माध्यमातून जागतिक समुदायाकडून केले जाते.
शिरीन एबादींनी मांडली कल्पना
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा करण्याची कल्पना सर्वप्रथम इराणच्या नोबेल पुरस्कार विजेत्या शिरीन एबादी यांनी मांडली. जानेवारी 2004 मध्ये एबादी यांनी सर्वप्रथम ही कल्पना मांडली आणि नंतर त्याला जगभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. काँग्रेसच्या नेत्यांनीही याचे समर्थन केले.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे आवाहन
गांधी जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी शांततेच्या आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार केला आहे. 'द्वेष, विभाजन आणि संघर्षाचा दिवस. शांती, विश्वास आणि सहिष्णुतेच्या नवीन युगाची सुरुवात करण्याची वेळ. या आंतरराष्ट्रीय अहिंसेच्या दिवशी - गांधींचा वाढदिवस - त्याच्या शांततेच्या संदेशाकडे लक्ष देऊया आणि सर्वांसाठी चांगले भविष्य घडवण्याचा संकल्प', असे गुटेरेस यांनी ट्विट केले आहे.
2007 मध्ये युएनकडून मंजुरी
यानंतर संयुक्त राष्ट्राने 15 जून 2007 मध्ये यासंबंधीचा एक प्रस्ताव स्वीकार करत 2 ऑक्टोबर हा दिवस "आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन" म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली. तेव्हापासून महात्मा गांधींचा जन्मदिवस हा "आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन" म्हणून साजरा केला जातो.
२ ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो, ही गांधी जयंतीच्या सर्वात विशेष बाबींपैकी एक बाब समजली जाते. १५ जून २००७ ला संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीने २ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या रुपात साजरा व्हावा म्हणून ठराव केला होता. अहिंसेचा मार्ग अनुसरून स्वातंत्र्य मिळवता येऊ शकते असे महात्मा गांधी यांनी जगाला शिकवले. हिंसेचा मार्ग निवडणून आपण आपले अधिकार कधीही मिळवू शकत नाही, असे गांधीजींचे म्हणणे होते. अहिंसेच्या मार्गानेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत सुमारे ७५ हजार भारतीयांना त्यांचे अधिकार मिळवून दिले होते.
स्वातंत्र्य आंदोलनात अहिंसेची भूमिका
अहिंसा.... जेव्हा आपण अहिंसेबाबत बोलतो. तेव्हा सर्वप्रथम आपल्याला 'बापू' हे नाव आठवते. महात्मा गांधी यांनी केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला अहिंसेचा अर्थ समजावून सांगितला. अहिंसा ही एक व्यक्तीगत सवय असून कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला किंवा दुसऱ्याला नुकसान पोहोचवले जाऊ नये, असा याचा अर्थ आहे.
दलित आणि महात्मा गांधी
आमच्या समाजात एका मोठ्या समुदायाला अस्पृश्य म्हटले जात होते. महात्मा गांधी यांनी या समुदायाला 'हरिजन' असे संबोधणे सुरू केले. या शब्दाचा अर्थ आहे हरिची (देवाची) माणसे. महात्मा गांधी यांनी उचललेल्या या पावलाने दलित समुदायाच्या लोकांना सन्मानपूर्वक जीवन देण्याच्या प्रयत्नात एक मोठी भूमिका अदा केली.
हेही वाचा - यंदा रंगणार गरबा! आरोग्य मंत्री म्हणाले लसीकरणाची गती चांगली असल्याने गरब्याला मान्यता