ETV Bharat / bharat

International Day of Action for Rivers 2023 : जाणून घ्या का साजरा करण्यात येतो इंटरनॅशनल डे ऑफ अ‍ॅक्शन फोर रिव्हर्स - पाण्याचा स्त्रोत

नदींमध्ये होणाऱ्या प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी इंटरनॅशनल डे ऑफ अ‍ॅक्शन फोर रिव्हर्स हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी वेगळी थीम घेऊन जनजागृती करण्यात येते.

International Day of Action for Rivers 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 14, 2023, 10:38 AM IST

हैदराबाद : नदी हा एकमेव पाण्याचा स्त्रोत असल्याने ग्रामीण जीवन नदीच्या पाण्यावर अवलंबून होते. मात्र आता सिमेंटच्या अतिक्रमणामुळे नद्यांमध्ये प्रचंड प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे नद्यांना जीवंत ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर इंटरनॅशनल डे ऑफ अ‍ॅक्शन फोर रिव्हर्स ही मोहीम राबण्यात येत आहे. या माध्यमातून नद्यांच्या स्वच्छतेसाठी कृती कार्यक्रम आखून त्याची अमलबंजावणी करण्यात येते. त्यामुळे १४ मार्च हा दिवस रिव्हर्स डे म्हणूनही साजरा करण्यात येतो.

दोन दशलक्ष टन सांडपाणी सोडले जाते नदीत : नद्यांना वाचवण्यासोबतच त्याबाबतची जनजागृती करण्यासाठी १४ मार्च हा दिवस नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जगात दररोज दोन दशलक्ष टन सांडपाणी, औद्योगिक कचरा नदीच्या पाण्यात सोडला जातो. तो 6.8 अब्ज लोकसंख्येच्या वजनाइतका आहे. त्यामुळे आता मानव कल्याणासाठी आपण आपल्या नद्या वाचवण्याची वेळ आली आहे.

नद्या का आहेत महत्त्वाच्या : नद्या वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन साजरा करुन लोकांना नद्यांचे महत्त्व पटवून देण्यात येते. त्यामुळे १४ मार्च हा दिवस नद्या वाचवण्यासाठी समर्पित करण्यात आला आहे. १४ मार्च या दिवशी जगभरातील नागरिकांना नदी प्रदूषण, नदी संवर्धनाशी संबंधित समस्यांवर चर्चा करून नद्या वाचवण्यासाठी जनजागृती करण्यासाठी महत्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी वेगवेगळी थीम घेऊन हा दिवस साजरा करण्यात येतो.

कसा सुरू झाला नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन : नद्यांचे प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढल्याने आजार बळावले आहेत. दूषीत पाण्यामुळे रोगराई पसरल्याने मानवी वस्तीतही त्या आजाराचा शिरकाव होतो. त्यामुळे नद्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिनाच्या उत्पत्तीचा इतिहास मनोरंजक आहे. सप्टेंबर 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय नदी नेटवर्क, भारताचे नर्मदा बचाव आंदोलन, चिलीचा बायोबायो अॅक्शन ग्रुप आणि युरोपियन रिव्हर नेटवर्क यासह अनेक संस्था एकत्र आल्या. त्यानंतर ब्राझीलमध्ये त्याबाबतची पूर्वतयारी बैठक झाली. या बैठकीत संघटनांनी मोठ्या धरणांमुळे प्रभावित झालेल्या ब्राझिलियन मूव्हमेंट ऑफ पीपलच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय आयोजन समितीची स्थापना केली. मार्च 1997 मध्ये ब्राझीलमधील क्युरिटिबा येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय बैठकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी आंतरराष्ट्रीय कृती दिन साजरा करण्याचे निश्चित केले. या बैठकीत सर्वानुमते 14 मार्च हा नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन साजरा केला जाणार असल्याचे ठरवल्याने हा दिवस साजरा करण्यात येतो.

दरवर्षी घेतली जाते एक थीम : दरवर्षी नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिनाची थीम ठरवण्यात येते. या अगोदर 'नद्यांचे हक्क' ही थीम घेऊन नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन साजरा करण्यात आला होता. नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी पर्यावरणप्रेमी कार्यशाळा, परिसंवाद आणि उपक्रम आयोजित करतात. यावर्षी राईट ऑफ रिव्हर्स ही थीम घेऊन नद्यांच्या प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

हेही वाचा - World Birth Defects Day 2023 : जगभरात दरवर्षी 8 दशलक्ष नवजात बाळांना होतो जन्मदोष, अशी घ्या काळजी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.