ETV Bharat / bharat

घर पाडणे थांबवा! कारवाई स्थगित करण्याचे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे निर्देश - डिंडोरी जिल्ह्यात एका मुस्लिम व्यक्तीचे घर पाडले

डिंडोरी जिल्ह्यात एका मुस्लिम व्यक्तीचे घर आणि त्याची तीन दुकाने पाडण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी तक्राल दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने पुढील कारवाई करू नका असे निर्देश पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, या कुटुंबाने तक्रार दिलेली आहे. जबलपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती नंदिता दुबे यांच्या अध्यक्षतेखालील एकल खंडपीठाने २२ वर्षीय साक्षी साहू हिच्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला.

अनाधिकृत घरे पाडले
अनाधिकृत घरे पाडले
author img

By

Published : Apr 26, 2022, 1:01 PM IST

डिंडोरी (मध्य प्रदेश)- डिंडोरी जिल्ह्यात एका मुस्लिम व्यक्तीचे घर आणि त्याची तीन दुकाने पाडण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी तक्राल दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने पुढील कारवाई करू नका असे निर्देश पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, या कुटुंबाने तक्रार दिलेली आहे. जबलपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती नंदिता दुबे यांच्या अध्यक्षतेखालील एकल खंडपीठाने २२ वर्षीय साक्षी साहू हिच्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला.

  • After the house of interfaith couple Asif Khan & Sakshi Sahu was demolished by the @ChouhanShivraj govt, the govt's response was that it was done because villagers wanted it. Is this a banana republic? It took 5 years for Khan's father to build it. Will they live on streets now!

    — Dr. Shama Mohamed (@drshamamohd) April 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तीन दुकाने बेकायदेशीरपणे बांधल्याचा दावा - या तरुणीने कोर्टात सांगितले होते की आपण आसिफ खानशी स्वतःच्या इच्छेने लग्न केले आहे. दरम्यान, खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ते दोघे 7 एप्रिलपासून एकत्र राहत असल्याने विशेष विवाह कायद्यांतर्गत त्यांचे लग्न नोंदणीकृत होईल असही कोर्ट म्हणाले आहे. साक्षी साहू यांनी सांगितले की, भारताचे नागरिक असल्याने त्यांना त्यांच्या आवडीचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. 4 एप्रिल रोजी मध्य प्रदेश पोलिसांनी साहूच्या भावाच्या तक्रारीवरून महिलेचे अपहरण आणि भावाच्या सांगण्यावरून महिलेला लग्न करण्यास भाग पाडल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. 7 एप्रिल रोजी, जिल्हा प्रशासनाने खान यांच्या कुटुंबाची तीन दुकाने बेकायदेशीरपणे बांधल्याचा दावा ते करत आहेत.

  • कलेक्टर श्री रत्नाकर झा ने डिंडोरी जिले में छात्रा के अपहरण के मामले में आरोपी आसिफ खान के दुकान और मकान को जमींदोज कर दिया गया है। दो दिवस तक आरोपी आसिफ खान के दुकानों सहित उसके अवैध मकान पर कार्रवाई की गई है।#MafiaMuktMP#sashaktmp @CMMadhyaPradesh pic.twitter.com/Kcf6DIGAJC

    — Collector Dindori (@dindoridm) April 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

साक्षीने गंभीर आरोप केले - घर पाडल्याच्या काही तासांनंतर, माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सिंह राजपूत यांनी आंदोलन केले, ज्यांनी खान यांचे घर देखील पाडले पाहिजे अशी मागणी केली. जिल्हाधिकारी रत्नाकर झा आणि उपविभागीय दंडाधिकारी बलबीर रमण यांच्यासह जिल्हा अधिकाऱ्यांच्या पथकाने आंदोलकांची भेट घेतली. 8 एप्रिल रोजी 500 पोलीस कर्मचाऱ्यांसह खान यांच्या घराची तोडफोड करण्यात आली होती.

घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्न - स्थानिक तहसीलदार बीएस ठाकूर यांनी त्यांचे घर बेकायदेशीर घोषीत केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. गावातील जातीय तणावाला रामन यांनी विध्वंस मोहिमेचे श्रेय दिले. साक्षीने सांगितले की, लोकांना घर पाडायचे होते. ९ एप्रिल रोजी साहूने एका व्हिडिओ संदेशात म्हटले होते की ती खानसोबत स्वेच्छेने पळून गेली होती. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता मी आसिफ खानशी लग्न केल असही ती म्हणाली आहे.

माझे पती दोघेही आत्महत्या करू - साक्षी म्हणाली की, माझ्या पतीच्या कुटुंबाला खोट्या केसमध्ये गोवण्यात येत आहे. मी माझ्या स्वेच्छेने त्याच्याशी लग्न केले, पण माझे कुटुंब तथ्यांचा गैरवापर करत असून असिफच्या कुटुंबावर खोट्या केसेस लादत आहेत. त्यांचा छळ केला जात आहे. त्यांच्या घरांची आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते की मला मदत करावी अन्यथा मी आणि माझे पती दोघेही आत्महत्या करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा - Elon Musk Bought Twitter : उद्योगपती इलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक! 44 अब्ज डॉलरला केले खरेदी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.