श्रीनगर जम्मू काश्मीर Jammu Kashmir मधील लाईन ऑफ कंट्रोलवर भारतीय लष्काराने नौशेरामध्ये घुसखोरीचा प्रयत्न Infiltration Attempt Failed हाणून पाडला. लष्कराने केलेल्या कारवाईत दोन पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले. जम्मूतील लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवादी भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न Infiltration Attempt करत होते.
मे महिन्याच्या सुरुवातीला जम्मू काश्मीरमध्ये Jammu Kashmir नियंत्रण रेषेवर सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले होते. जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा दलानी ठार केले होते. लष्कराने सांगितले की, दहशतवाद्यांकडून इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस आयईडीसह शस्त्रे जप्त करण्यात आली. दहशतवाद्यांचा जम्मू काश्मीरमधील शांतता बिघडवणे आणि अमरनाथ यात्रा विस्कळीत करणे हाच हेतू होता.
लष्कराच्या म्हणण्यानुसार, केरन सेक्टरच्या पुढील भागात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात Infiltration Attempt Failed आला, ज्यामध्ये तीन दहशतवादी मारले गेले होते आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली. त्याचवेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, चकमकीदरम्यान गंभीर जखमी झालेल्या लष्कराच्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काश्मीर पोलीस झोनने ट्विटरवर सांगितले की, लष्कराचा कुचिबनचा रहिवासी कुली लतीफ मीर चकमकीत जखमी झाला. नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.