ETV Bharat / bharat

INDW vs ENGW T-20 Series : भारतीय महिला संघाने दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडचा पराभव केला - England Womens Cricket Team

भारतीय संघाला पहिल्या सामन्यात नऊ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे आवश्यक होते. त्यानुसार भारतीय संघाने आपल्या कामगिरीत सुधारणा करताना, दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंड संघाचा 8 विकेट्सने पराभव ( INDW beat ENGW by 8 wickets ) केला.

INDW
भारतीय महिला क्रिकेट संघ
author img

By

Published : Sep 14, 2022, 12:15 PM IST

नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंड संघाचा 8 विकेट्सने पराभव ( INDW beat ENGW by 8 wickets ) केला. प्रथम खेळताना इंग्लंडने 6 गड्यांच्या मोबदल्यात 142 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात भारतीय संघाने 2 विकेट गमावून 146 धावा केल्या. दुसऱ्या टी-20 सामन्यात स्मृती रंधावाने शानदार खेळी केली, ज्यामुळे भारतीय महिला संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.

तसेच, याआधी पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला नऊ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे आवश्यक होते. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला ( England Won The Toss ) होता. इंग्लंड संघाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 142 धावा केल्या होत्या. यजमानांकडून फ्रेया केम्पने ( Batsman Freya Kemp ) सर्वाधिक 51 धावा केल्या, तर मायिया बाउचियरने 34 धावांचे योगदान दिल्या. या दोघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने चांगला खेळ केला नाही. भारताकडून स्नेह राणाने तीन, तर रेणुका सिंग आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.

शानदार सुरुवातीनंतर भारताने जिंकला सामना -

143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. शेफाली वर्मा 20 धावा करून बाद झाली, पण तोपर्यंत पॉवरप्लेमध्ये संघाच्या 55 धावा झाल्या होत्या. भारताची दुसरी विकेट 77 धावांवर पडली, जेव्हा दयालन हेमलता 9 धावांवर बाद झाली. यानंतर सलामीवीर स्मृती मानधना ( Opener Smriti Mandhana ) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यात अतूट भागीदारी झाली आणि संघाने 16.4 षटकांत लक्ष्य गाठले.

सलामीवीर स्मृती मानधनाने शानदार फलंदाजी करताना 53 चेंडूत 79 धावांची नाबाद खेळी साकारली. ज्यामध्ये 13 चोकारांचा समावेश होता. त्याचबरोबर कर्णधार हरमनप्रीत कौरने ( Captain Harmanpreet Kaur ) देखील तिला योग्य साथ देताना 22 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 29 धावांची खेळी केली. तसेच स्मृती मानधनाला तिच्या शानदार खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हेही वाचा - Sri Lanka Cricket and Netball Team : कोलंबोमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट आणि नेटबॉल संघाचे भव्य स्वागत

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.