तिरुवनंतपुरम- देशातल पहिली कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या महिलेला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य यंत्रणेनेबाबत ही माहिती दिली आहे.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या महिलेला कोरोनाची पुन्हा लागण झाली आहे. तिची पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर अँटीजेन निगेटिव्ह आहे. तिला कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे थिस्सूरचे डीएमओ डॉ. के. आर. जीना यांनी माध्यमांना सांगितले.
हेही वाचा-काश्मीरच्या तरुणाने केली अनोखी मस्त्यशेती; आता अनेकांना देतोय रोजगार
महिलेच्या स्वॅबचे नमुने गोळा गोळा करण्यात आले आहेत. अभ्यासाची तयारी करण्यासाठी दिल्लीला जाण्याची तिने तयारी सुरू केली आहे. मात्र, आरटी-पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाबाधित महिला ही घरी असून तिची तब्येत स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा-देशातील कोरोनाची 'आर-व्हॅल्यू' वाढली; ही धोक्याची घंटा - आयएमएससी
गतवर्षी देशात पहिल्यांदा कोरोनाची झाली होती लागण-
कोरोनाबाधित महिला ही चीनमधील वुहान विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत होती. ती सुट्ट्यांमध्ये गतवर्षी चीनहून भारतात आली होती. त्यानंतर तिला 30 जानेवारी 2020 रोजी कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. महिलेने थिस्सूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये तीन आठवडे उपचार घेतले होते. त्यानंतर तिची दोनदा कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. तब्येत बरी झाल्यानंतर तिला 20 फेब्रुवारी 2020 रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.
हेही वाचा-देशातील कोरोनाची 'आर-व्हॅल्यू' वाढली; ही धोक्याची घंटा - आयएमएससी