ETV Bharat / bharat

Indias First Cloned Gir Calf : दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या गीर जातीच्या गायीचे यशस्वी क्लोनिंग - first cloned gir calf

हरियाणातील करनाल येथील एनडीआरआयमध्ये गीर गायीच्या पहिल्या क्लोन केलेल्या वासराचा जन्म झाला. ही कामगिरी करण्याचे श्रेय एनडीआरआयच्या शास्त्रज्ञांना जाते.

Indias First Cloned Gir Calf
दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या गीर जातीच्या गायीचे यशस्वी क्लोनिंग
author img

By

Published : Mar 28, 2023, 5:14 PM IST

करनाल (हरियाणा) : देशात दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या गिर जातीच्या गायीचे यशस्वी क्लोनिंग करण्यात आले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद - राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी हा पराक्रम केला आहे.

16 मार्चला झाला जन्म : 16 मार्चला नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, करनालमध्ये गिर जातीच्या क्लोन केलेल्या वासरूचा जन्म झाला. ज्याचे वजन 32 किलो होते आणि ते पूर्णपणे निरोगी आहे. गीर जातीची गाय ही देशातील सर्वात प्रसिद्ध गाय जातींपैकी एक आहे. गीर जातीची गाय गुजरातमध्ये आढळते. या जातीच्या माध्यमातून इतर जातींच्या गायींचा दर्जा सुधारण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत.

गीरचे वैशिष्ट्य : गिर जातीच्या गायीची सहनशीलता हा तिचा सर्वात मोठा गुण आहे. ही गाय उच्च तापमान तसेच कडाक्याची थंडी सहज सहन करते. या गायीची रोग प्रतिकारक क्षमता देखील तिला विशेष बनवते. त्यामुळेच या गायीला भारतातच नाही तर ब्राझील, अमेरिका, मेक्सिको आणि व्हेनेझुएलामध्येही मोठी मागणी आहे.

शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे फळ : गायींच्या जाती सुधारण्यासाठी शास्त्रज्ञांची एक टीम या क्षेत्रात कार्यरत आहे. ज्यामध्ये डॉ.नरेश सेलोकर, रणजीत वर्मा, अजय अस्वाल, एम.एस. चौहान, मनोज कुमार सिंग, कार्तिकेय पटेल, सुभाष कुमार आणि एसएस लाथवाल यांचा समावेश आहे. ही टीम 2 वर्षांहून अधिक काळ गायींचे क्लोनिंग करण्यासाठी एक देशी पद्धत विकसित करण्यात गुंतलेली होती. या पद्धतीमध्ये, अल्ट्रासाऊंड-मार्गदर्शित सुया वापरून, प्राण्यांकडून अंडी घेतली जातात आणि 24 तास अनुकूल परिस्थितीत ठेवली जातात. पक्व झाल्यानंतर आणि इतर काही टप्प्यांत ते गायीमध्ये प्रत्यारोपित केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेच्या 9 महिन्यांनंतर, क्लोन केलेले वासरू किंवा वासराचा जन्म होतो.

शास्त्रज्ञांचे अभिनंदन : भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांच्या मते, आपले प्राणी देशाचे वेगवेगळे तापमान सहन करतात. सर्व प्रकारच्या हवामानाशी जुळवून घेतात, हे प्राणी रोग प्रतिरोधक देखील असतात. या क्लोनिंगसाठी स्वदेशी पद्धत विकसित केल्याबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन करून ते म्हणाले की, मला आशा आहे की, ही टीम तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधन सुरू ठेवेल आणि अधिकाधिक क्लोनिंगचे ध्येय गाठेल. गुरांचे क्लोनिंग करून देशातील शेतकऱ्यांना अधिक दूध देणाऱ्या देशी जातींची गरज भागवली जाऊ शकते.

शेतकऱ्यांना होणार फायदा : दुसरीकडे, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, करनालचे संचालक डॉ. धीर सिंह यांनी सांगितले की, या यशामुळे आम्हाला देशातील गुरांच्या क्लोनिंगसाठी संशोधन उपक्रमांचा विस्तार करण्यास मदत होईल. क्लोनिंग तंत्राच्या सहाय्याने चांगल्या दर्जाच्या देशी प्राण्यांच्या उत्पादनात वैज्ञानिक नवीन आयाम प्रस्थापित करत आहेत. याच्या मदतीने भविष्यात देशात चांगल्या दर्जाची जनावरे मिळतील. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

2021 पासून काम : एनडीआरआयनुसार, गीर, साहिवाल, थारपारकर आणि रेड सिंधी या देशी जातींच्या गायी दुग्धोत्पादन आणि देशाच्या डेअरी उद्योगाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. या दिशेने, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्नालने उत्तराखंड पशुधन विकास मंडळ, डेहराडूनच्या सहकार्याने, एनडीआरई कर्नालचे माजी संचालक डॉ. एम.एस. चौहान यांच्या नेतृत्वाखाली, गीर, लाल-सिंधी या देशी गायींचे क्लोनिंग सुरू केले. आणि साहिवाल.. प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी आणि या देशी गायींची लोकसंख्या वाढवण्यासाठी प्राण्यांच्या क्लोनिंगसारखे तंत्र शोधणे हे आव्हानात्मक काम आहे.

हेही वाचा : Mumbai Corona Update: सावधान! तीन नवजात बालकांना कोरोनाची बाधा झाल्याचा संशय; चाचणीसाठी पाठवले नमुने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.