ETV Bharat / bharat

UPI In Sri Lanka : आता श्रीलंकेतही करता येणार UPI द्वारे पेमेंट, दोन देशांमध्ये झाला सामंजस्य करार

विदेशात फिरायला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी एक गुड न्यूज आहे. आता येथून पुढे भारतीय नागरिक श्रीलंकेतही UPI द्वारे पेमेंट करू शकणार आहेत.

UPI In Sri Lanka
श्रीलंकेत UPI द्वारे पेमेंट
author img

By

Published : Jul 21, 2023, 7:31 PM IST

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांनी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार आता भारतीयांना श्रीलंकेत युपीआयद्वारे पेमेंट करता येणार आहे. यामुळे भारतीय चलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक लोकप्रियता मिळेल, असे तज्ञांचे मत आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारत भेटीवर आलेले श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्याशी विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. विक्रमसिंघे गुरुवारी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी दिल्लीत पोहोचले. गेल्यावर्षी अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडल्यानंतर श्रीलंकेच्या वरिष्ठ नेत्याची ही पहिलीच भारत भेट आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात, पंतप्रधान मोदींनी गेल्यावर्षी श्रीलंकेला भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींचा उल्लेख केला. ते म्हणाले की, एक जवळचा मित्र म्हणून आम्ही या संकटाच्यावेळी श्रीलंकेच्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. ते म्हणाले की, श्रीलंकेत UPI पेमेंट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये फिनटेक कनेक्टिव्हिटी स्थापित होईल.

UPI ला परवानगी देणारा भूतान पहिला देश : श्रीलंका आता नवीनतम देश बनला आहे, जो आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी यूएस डॉलरऐवजी भारतीय रुपया स्वीकारेल. जुलै 2021 मध्ये, मोबाइल आधारित पेमेंटसाठी UPI आणि BHIM अ‍ॅप वापरणारा भूतान पहिला देश बनला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महिन्याच्या सुरुवातीला संयुक्त अरब अमिरातीच्या भेटीदरम्यान या दोन देशांनी UPI द्वारे पेमेंट स्वीकारण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती.

या देशांत UPI द्वारे पेमेंट शक्य : यावर्षी फेब्रुवारीमध्ये, भारताच्या UPI आणि सिंगापूरच्या PayNow ने एकमेकांशी करार केला होता. तर ऑक्टोबर 2022 मध्ये, ओमानच्या पेमंट सिस्टमने UPI सोबत हातमिळवणी केली होती. या सोबतच 13 जुलै रोजी, मोदींच्या पॅरिस भेटीदरम्यान, भारत आणि फ्रान्सने भारतीय पर्यटकांना रुपयाच्या व्यवहारासाठी UPI वापरण्याची परवानगी देणारा करार केला होता. मालदीव हा भारताच्या शेजारील दुसरा देश आहे जो UPI पेमेंट स्वीकारतो.

भारतीय पर्यटकांसाठी चांगली बातमी : या करारामुळे श्रीलंकेवर आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी अमेरिकन डॉलरवर अवलंबून राहण्याचा दबाव कमी होईल. श्रीलंकेचे लोक आणि व्यापारी आता भारतीय रुपयात पेमेंट करू शकतील. पर्यटन हा श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था भारतीय पर्यटकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. UPI व्यवहारांवरील करारामुळे भारतीय पर्यटकांना आता रुपयामध्ये पेमेंट करणे शक्य होणार आहे.

हेही वाचा :

  1. Netflix sharing in India : भारतात पासवर्ड शेअरिंग करण्यावर नेटफ्लिक्सची बंदी
  2. Highest Average Salary In India : देशात सोलापुरात मिळतो सर्वाधिक पगार? मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांना टाकले मागे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.