नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने IRCTC द्वारे ऑनलाइन तिकीट बुकिंगची कमाल संख्या वाढवली आहे. रेल्वेच्या निर्णयानंतर आधार कार्ड लिंक नसलेल्या प्रवाशांनाही एका महिन्यात डझनभर तिकिटे बुक करता येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी, भारतीय रेल्वेने एका महिन्यात जास्तीत जास्त 6 तिकिटे बुक करण्याची 12 तिकिटांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आधार लिंक केलेल्या युजर आयडीद्वारे एका महिन्यात जास्तीत जास्त 12 तिकिटे बुक करण्याची मर्यादा होती, जी आता 24 तिकिटे झाली आहे.
आधार लिंक नसलेल्या यूजर आयडीद्वारे IRCTC वेबसाइट किंवा अॅपवर एका महिन्यात जास्तीत जास्त 6 तिकिटे ऑनलाइन बुक केली जाऊ शकतात होती. आधार लिंक केलेल्या वापरकर्ता एका महिन्यात जास्तीत जास्त 12 तिकिटे IRCTC वेबसाइट किंवा अॅपवर ऑनलाइन काढू शकत होता.
तिकीट बुक करताना पत्त्याची माहिती देणेही गरजेचे नाही - रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुक करण्याच्या पद्धतीतही मोठा बदल केला आहे. आता प्रवाशांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी खूप कमी वेळ लागणार आहे. नव्या नियमानुसार प्रवाशांना तिकीट काढताना त्यांच्या पोहोचण्याच्या ठिकाणची व त्या ठिकाणच्या पत्त्यची माहिती देणे बंधनकार नाही. यापूर्वी बुकिंग करताना प्रवाशांना पत्ता भरण्यासाठी दोन ते तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत होता. आता तो वेळही वाचणार असून, यामुळे ऑनलाइन तिकीट बुकिंग लवकरच होणार आहे. तत्काळ तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. कारण, तत्काळ तिकीट काढताना वेळेची सर्वाधिक काळजी घ्यावी लागते.
हेही वाचा - 2 rupees from railway after 5 years: रेल्वेकडून 2 रुपये परत मिळण्याकरिता अभियंत्याचा 5 वर्षे संघर्ष