कारवार (कर्नाटक) - भारतीय नौदल येत्या काही वर्षांत जगातील अव्वल तीन नौदलापैकी एक बनून देशाच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी व्यक्त केला. कर्नाटकातील कारवार नौदल तळावर 'प्रोजेक्ट सीबर्ड' अंतर्गत सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी भेट दिली होती.संरक्षणमंत्र्यांनी कारवार नौदल तळावरील प्रकल्प सीबर्ड कॉन्टॅक्टर्स आणि अभियंता व अधिकारी, नाविक व नागरीकांशी संवाद साधला. आपल्या भाषणात त्यांनी 'प्रोजेक्ट सीबर्ड' अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कावर नौदल तळ आशियातील सर्वात मोठा नौदल तळ होईल आणि सशस्त्र दलांच्या परिचालन तत्परतेला चालना देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या नौदल तळामुळे व्यापार, अर्थव्यवस्था आणि मानवतावादी मदत कार्यात वाढ करण्यास मदत होईल, असेही राजनाथ सिंह म्हणाले. सैन्य व राजनैतिक व व्यावसायिक पातळीवर भारताचे स्थान बळकट करण्याबरोबरच सागरी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सैन्यांचे संरक्षणमंत्र्यांनी कौतुक केले.
नौसेने देशाच्या संरक्षणाची आपली कर्तव्ये यशस्वीरित्या पार पाडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्पना केलेल्या 'सागर' (सुरक्षा आणि विकास सर्वांसाठी प्रदेश) यावर लक्ष केंद्रित करून नौदल आपल्या सागरी शेजार्यांशी संबंध सातत्याने मजबूत करत आहे. 1961 च्या गोवा मुक्ती युद्ध आणि 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या काळात भारतीय नौदलाच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. तसेच कोरोनाकाळात मदत करण्याच्या भारतीय नौदलाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. प्रभावित देशांमधून अडकलेल्या भारतीय नागरिकांना परदेशातून परत आणणे. परदेशातून ऑक्सिजन सिलिंडर्सचा परिवहन करणे, आदी कामे करत नौदलाने कोरोनाविरूद्धच्या लढ्यात अथक परिश्रम घेतले आहेत. तसेच देशांना मदतही केली आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी सरकारने घेतलेल्या अनेक उपक्रमांचीही त्यांनी माहिती दिली. की 48 जहाज आणि पाणबुडींपैकी 46 जहाज स्वदेशी असल्याचे त्यांनी सांगितले.