ETV Bharat / bharat

2047 पर्यंत अमेरिका व चीनच्या बरोबरीची असेल भारतीय अर्थव्यवस्था - मुकेश अंबानी

अंबानींनी म्हटले की, 2047 मध्ये आम्ही स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करत आहोत. त्यावेळी आपण जगातील तीन बलाढ्य अर्थव्यवस्थेपैकी एक असू, त्यावेळी अमेरिका व चीनच्या बरोबरीची भारताची अर्थव्यवस्था असेल.

author img

By

Published : Jul 24, 2021, 6:11 PM IST

Mukesh Ambani
Mukesh Ambani

नवी दिल्ली - देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती उद्योगपति मुकेश अंबानी यांचे मत आहे, की भारतात मागील तीन दशकात झालेल्या आर्थिक सुधारांचा लाभ नागरिकांना असमान रुपाने झाला आहे. अंबानींनी म्हटले आहे, की समाजातील सर्वात खालच्या स्तरातील लोकांच्या प्रगतीसाठी विकासाच्या 'भारतीय मॉडल'ची आवश्यकता आहे. त्याचबरोबर अंबानी यांनी विश्वास व्यक्त केला की, भारत 2047 पर्यंत अमेरिका व चीनच्या बरोबरीचा असेल.

देशात आर्थिक उदारीकरण मॉडलला 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी यांनी एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की धाडसी आर्थिक सुधारणांच्या कारणामुळे 1991 मध्ये आपला जीडीपी 266 अरब डॉलर होता ते आज दहापट वाढला आहे.

अंबानींनी 'द टाइम्स ऑफ इंडिया' मध्ये प्रकाशित आपल्या लेखात म्हटले आहे, 1991 मध्ये भारताची अर्थव्यवस्था कमजोर होती जी 2021 मध्ये मजबूत बनली आहे. आता भारताला 2051 पर्यंत सर्वांना समान संधी देणारी व शाश्वत अर्थव्यवस्थेच्या रुपात बदलायचे आहे.

अंबानींनी म्हटले आहे, की 1991 मध्ये भारताने अर्थव्यवस्थेची दिशा बदलण्यासाठी काही धाडसी निर्णय घेतले. सरकारने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत खासगी उद्योगानाही सामील करू घेतले. त्याआधीच्या चार दशकात हे स्थान केवळ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना होते. या निर्णयामुळे लायसेंस-कोटा राज समाप्त झाले व आर्थिक क्षेत्र मुक्त झाले. या आर्थिक सुधारणांमुळे भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. या दरम्यान देशाची लोकसंख्या भलेही 88 कोटींपासून 138 कोटी झाली मात्र गरीबीचा दर निम्म्यावर राहिला.

अंबानींनी म्हचले आहे, की देशात पायाभूत सुविधांचा स्तर सुधारला आहे. आता आपले एक्सप्रेस वे, विमान तळे व बंदरे जागतिक स्तराची आहेत. अशीच स्थिती देशातील उद्योह व सेवा क्षेत्राची आहे. आता आपल्याला हे काल्पनिक वाटेल की, लोकांना टेलिफोन किंवा गॅस कनेक्शनसाठी प्रतीक्षा करावी लागत होती. तसेच कंपन्यांना संगणक खरेदीसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत होती.

अंबानींनी म्हटले की, 2047 मध्ये आम्ही स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करत आहोत. त्यावेळी आपण जगातील तीन बलाढ्य अर्थव्यवस्थेपैकी एक असू, त्यावेळी अमेरिका व चीनच्या बरोबरीची भारताची अर्थव्यवस्था असेल. मात्र हा मार्ग सोपा नाही. महामारी सारख्या अचानक येणाऱ्या अस्थायी समस्यांना घाबरुन चालणार नाही. त्याचबरोबर कमी महत्वाच्या मुद्यावरून आपले लक्ष्य विचलित झाले पाहिजे. आपल्याकडे संधी आहे, त्याचबरोबर आपली जबाबदारी आहे, की आपण आपली मुले व युवकांसाठी पुढील 30 वर्ष स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ वर्षात बदलायची आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.