नवी दिल्ली : नुकतेच भारताने वीरांना श्रध्दांजली वाहण्यासाठी ब्रिटीश सैन्यातील नातेवाईकांची मदत केली. दुसऱ्या महायुध्दात यशवंत घाडगे यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी भारताने ऑस्ट्रेलियातील ब्रिटीश जवानांच्या नातेवाईकांची मदत केली.
दुसऱ्या महायुध्दात ब्रिटीश सैन्याकडून लढलेल्या यशवंत घा़डगे यांच्याबद्दल विचारपूस करणारा मेल इटलीतील भारताचे संरक्षण कर्नल व्ही.एस. सलारिया या लष्करी अधिकाऱ्याला आला. ऑस्ट्रेलिया येथे राहणाऱ्या जॉर्ज फ्रीमन यांनी अरेझो स्मशानभूमीतील वीरमरण आलेल्या यशवंत घाडगे यांच्या समाधीला भेट देऊन श्रध्दांजली वाहायची आहे. अशा आशयाचा मेल इटलीतील भारताचे संरक्षण कर्नल व्ही.एस. सलारिया यांना पाठवला होता.
कोण आहेत यशवंत घाडगे?
यशवंत घाडगे देखील पाचव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये शिपाई म्हणून होते. इंग्लंडविरुध्द इटलीच्या मोहिमेवर त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती. या त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना इंग्लंडचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार मरणोत्तर व्हिक्टोरिया क्रॉस (VC) ने सन्मानित करण्यात आले. नाईक यशवंतराव घाडगे यांच्या स्मरणार्थ माणगावच्या मामलेदार कचेरीजवळ त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. अजूनही तेथे दरवर्षी ९ जानेवारीला ‘घाडगे महोत्सव’ साजरा करण्यात येतो.
अशी झाली गुडविन घाडगेंची मैत्री
फ्रीमन यांचे काका एचडब्ल्यू गुडविन हे ब्रिटीश सैन्यातील शिपाई होते. ते 10 व्या भारतीय पायदळ विभागाचा भाग असून, इटालियन मोहिमेत घाडगेच्या चमूसोबत होते. गुडविन आणि घाडगे दोन्ही चांगले मित्र असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
यशवंत घाडगे लढले ब्रिटीश सैन्यासोबत
यंदा जूनमध्ये मी इटलीला येऊन अरेझो येथे यशवंत घाडगेंच्या समाधीला भेट देईन असेही फ्रीमन यांनी सालरियांना सांगितले. या प्रयत्नात मी तुम्हाला मदत करेन. असे म्हणत सलारिया यांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. घाडगे यांच्यासह अडीच लाख भारतीय सैनिक दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांसोबत लढले होते. व्ही.सी. घाडगे यांच्यासह आठ जणांना इटलीत दफन करण्यात आले.
गुडविन आणि घाडगेंची घट्ट मैत्री
फ्रीमन हे एक निवृत्त पेट्रोलियम अभियंता आहेत. त्यांनी सलारिया यांच्याशी इमेलद्वारे केलेल्या संभाषणात त्यांचे काका गुडविन आणि यशवंत घाडगे या दोघांमधील मैत्री उघड केली. काकांच्या अंत्यसंस्कारासाठी ते 2017 मध्ये इंग्लंडला गेले. फ्रीमन यांना काकांच्या डायरीत घाडगेंचा उल्लेख आढळून आला. कधी न भेटताही फ्रीमन यांचे काका गुडविन यांनी घाडगेंची विधवा पत्नी लक्ष्मीबाई यांना आर्थिक मदत केली. त्यांच्या डायरीत लक्ष्मीबाईंच्या पेन्शन समस्यांबद्दल ब्रिटिश अधिकारी आणि व्हिक्टोरिया क्रॉस आणि जॉर्ज क्रॉस असोसिएशनशी केलेले पत्रव्यवहारासंबंधी नोंद होती. यादरम्यान घाडगेंच्या बायको लक्ष्मीबाईचे रायगड येथे निधन झाले.
हेही वाचा - मध्य प्रदेशमधील आयएस नियाज खान यांचे काश्मीर फाईल्सवरील ट्विट चर्चेत, जाणून घ्या, कारण