ETV Bharat / bharat

Presidential Election 2022: राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर! 18 जुलै'ला मतदान तर 21 जुलै'ला मतमोजणी - presidential election has been declared

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख आज जाहीर जाहीर करण्यात आली ( Presidential Election 2022) 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. घटनेच्या अनुच्छेद 62 चा संदर्भ देत याबाबतची घोषणा निवडणूक आयोगाकडून आज करण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.

Presidential Election 2022
Presidential Election 2022
author img

By

Published : Jun 9, 2022, 12:58 PM IST

Updated : Jun 9, 2022, 3:37 PM IST

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख आज जाहीर जाहीर करण्यात आली ( Presidential Election 2022 ) 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. घटनेच्या अनुच्छेद 62 चा संदर्भ देत याबाबतची घोषणा निवडणूक आयोगाकडून आज करण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.

  • Voting for Presidential elections to be held on 18th July, counting of votes on 21st July: Chief Election Commissioner Rajiv Kumar pic.twitter.com/bTvawdiE9I

    — ANI (@ANI) June 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांव्यतिरिक्त, सर्व राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी येथील विधानसभा सदस्य हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकतात.

राज्यसभा, लोकसभा किंवा विधानसभेच्या नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही. त्याचप्रमाणे राज्यांच्या विधान परिषदेच्या सदस्यांनाही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार नाही. 2017 मध्ये राष्ट्रपती निवडणुकीसाठी 17 जुलै रोजी मतदान झाले होते आणि 20 जुलै रोजी मतमोजणी झाली होती.

जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी राज्यसभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांची कठीण परीक्षा आहे. 10 जून रोजी वरिष्ठ सभागृहाच्या 57 जागांसाठी चुरशीची लढत होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसद सदस्य (राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही) आणि राज्य विधानसभेचे सदस्य हे मतदार असतात. एकूण खासदारांची संख्या 776 आहे (राज्यसभा 233 लोकसभा 543) प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य 708 आहे. आमदारांच्या बाबतीत देशभरात एकूण 4,120 मते आहेत.

1971 च्या जनगणनेनुसार, त्यांच्या मताचे मूल्य राज्यानुसार बदलते. आसाम, त्रिपुरा आणि नागालँडमधून तीन जागा जिंकून 245 सदस्यांच्या सभागृहात भाजपने अलीकडेच 101 पर्यंत मजल मारली आहे. 16 रिक्त पदांमुळे राज्यसभेत सध्या 95 सदस्य आहेत.

हेही वाचा : President Nagpur Visit : आतापर्यंत 'या' राष्ट्रपतींनी दिली होती नागपूरला भेट

Last Updated : Jun 9, 2022, 3:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.