ETV Bharat / bharat

मिशन आत्मनिर्भर! तेजस लढाऊ विमानांसह लष्करी सामुग्रीच्या निर्यातीस मंजुरी - संरक्षण साहित्याची निर्यात बातमी

संरक्षण साहित्याची निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून नियोजनही आखण्यात येत आहे. पुढील पाच वर्षात म्हणजेच २०२५ पर्यंत ३५ हजार कोटी डॉलरची निर्यात करण्याचे लक्ष भारताने ठेवले आहे. त्यासाठी डिफेन्स एक्सपोर्ट पॉलिसीही आखली आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 4, 2021, 1:42 PM IST

बंगळुरू - तेजस लढाऊ विमाने मित्र देशांना निर्यात करण्यास भारत सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. सोबतच १५५ लष्करी साहित्य इतर देशांना निर्यात करण्यात येणार आहे. डीआरडीओने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. मात्र, कोणत्या देशांना ही निर्यात करण्यात येणार आहे, याची माहिती उघड केली नाही.

आत्मनिर्भर भारतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वदेशी संरक्षण साहित्याच्या निर्मितीला चालना देणार असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले आहे. तसेच देशी तंत्रज्ञानाला चालनाही देण्यात येत आहे.

तोफा, रणगाडे आणि क्षेपणास्त्रे होणार निर्यात -

तेजस हे हलके लढाऊ विमान, तोफा, स्फोटके, रणगाडे, क्षेपणास्त्र, रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रांचा या निर्यात करण्यात येणाऱ्या यादीत समावेश आहे. एरोनॅटिक सिस्टिम, बायोजॉलिकल केमिकल साहित्य, युद्धसाठी लागणारे साहित्य, नौदला सामुग्री, संपर्कव्यवस्था, जीवनरक्षक यंत्रणांचाही या निर्यातीत समावेश आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेन ही यादी जाहीर केली आहे.

संरक्षण साहित्याची निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून नियोजनही आखण्यात येत आहे. पुढील पाच वर्षात म्हणजेच २०२५ पर्यंत ३५ हजार कोटी डॉलरची निर्यात करण्याचे लक्ष भारताने ठेवले आहे. त्यासाठी डिफेन्स एक्सपोर्ट पॉलिसीही आखली आहे. संरक्षण क्षेत्रातील एकूण उलाढाल १ लाख ७५ हजार कोटी डॉलर करण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.