मॉस्को : युक्रेनने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या क्रेमलिनवर ड्रोनने हल्ला केल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाच्या म्हणण्यानुसार, पुतिन यांना मारण्याच्या उद्देशाने युक्रेनने हे पाऊल उचलले आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन पूर्णपणे सुरक्षित असल्याचे रशियाने म्हटले आहे. ही घटना काल (दि. 2 मे)रोजीची आहे. याबाबत रशियाने जारी केलेल्या निवेदनात त्यांनी दोन्ही ड्रोन पाडल्याचे सांगण्यात आले आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचेही त्यांनी सांगितले. रशियानेही या घटनेनंतर मोठे पाऊल उचलू शकते, असे स्पष्ट केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोठे पाऊल म्हणजे रशिया युक्रेनवर बदला घेऊ शकतो असेच बोलले जात आहे.
-
#WATCH | Russia today alleged that there were attempts by Ukraine to assassinate President Putin, saying it was a "terrorist attack" while claiming it shot down drones over the residence of Putin
— ANI (@ANI) May 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Video: Russia's RT news) pic.twitter.com/6b7jkeYluT
">#WATCH | Russia today alleged that there were attempts by Ukraine to assassinate President Putin, saying it was a "terrorist attack" while claiming it shot down drones over the residence of Putin
— ANI (@ANI) May 3, 2023
(Video: Russia's RT news) pic.twitter.com/6b7jkeYluT#WATCH | Russia today alleged that there were attempts by Ukraine to assassinate President Putin, saying it was a "terrorist attack" while claiming it shot down drones over the residence of Putin
— ANI (@ANI) May 3, 2023
(Video: Russia's RT news) pic.twitter.com/6b7jkeYluT
9 मे रोजी विजय दिवस : हा हल्ला किती मोठा असेल, याची कोणालाच कल्पना नाही. तसे, रशियाने सांगितले की ही घटना असूनही, 9 मे रोजी परेडचा कार्यक्रम पूर्ववत केला जाईल, त्यात कोणतेही बदल केले गेले नाहीत. रशिया 9 मे रोजी विजय दिवस साजरा करतो. या दिवशी रशियन लोकांनी हिटलरच्या सैन्याला हुसकावून लावण्यासाठी कारवाई केली. यात शहीद झालेल्या सर्व लोक आणि सैन्याच्या स्मरणार्थ विजय दिवस साजरा केला जातो.
आता सरकारची परवानगी आवश्यक : रशियन मीडियानुसार, रशियालाही या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. रशिया देखील असाच हल्ला करू शकतो असे सांगण्यात आले आहे. हल्ला केव्हा आणि कसा होईल याबद्दल फक्त अटकळ बांधली जात आहेत. मॉस्कोच्या महापौरांनी शहरात अनधिकृत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. कोणाला गरज भासल्यास सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन तो उड्डाण करू शकेल असही त्यांनी नमूद केले आहे.
झेलेन्स्की यांनी अधिक आक्रमक मोहिमेचे संकेत दिले : या हल्ल्यावर युक्रेनमधूनही प्रतिक्रिया आली आहे. युक्रेनने या घटनेत सहभाग असल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, रशियाने प्रत्युत्तर दिल्यास ते आपल्या देशाचे रक्षण करण्यास सदैव तयार आहेत. झेलेन्स्की सध्या फिनलंडच्या दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले की आम्ही काही देशांकडून आणखी विमाने घेण्यासाठी आलो आहोत जेणेकरून आम्ही रशियाशी निर्णायकपणे स्पर्धा करू शकू. झेलेन्स्की यांनी अधिक आक्रमक मोहिमेचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा : Upskirting : परवानगीशिवाय कोणत्याही महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढले तर तुम्ही थेट तुरुंगात