ETV Bharat / bharat

अफगाणिस्तानातून 80 भारतीयांची सुटका; हवाई दलाच्या विमानाने सायंकाळी मायदेशात परतणार - भारतीय हवाई दल विमान

अफगाणिस्तानमध्ये किती भारतीय आहेत, याची अचूक व तातडीने माहिती मिळविण्याला प्राधान्य असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांनी अफगाणिस्तान स्पेशल सेलला माहिती कळवावी, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.

India evacuates around 80 peopl
India evacuates around 80 peopl
author img

By

Published : Aug 21, 2021, 3:18 PM IST

नवी दिल्ली - अफगाणिस्तानमधील स्थिती आणखी वाईट होत असताना भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानाने सुमारे 80 भारतीयांना शनिवारी काबुलमधून नेले आहे. हे विमान ताजिकिस्तानच्या दुशान्बे येथील विमानतळावर उतरविण्यात आले आहे. नवी दिल्लीजवळील हिनदोन या धावपट्टीवर हे विमान सायंकाळी पोहोचणार आहे.

सी-17 विमानाने केल्या दोन फेऱ्या

यापूर्वी भारताने अफगाणिस्तानमधील भारतीय राजदुतासह 200 भारतीयांना सी-17 या हवाईदलाच्या विमानाने भारतात आणळे आहे. तर सोमवारी अफगाणिस्तानमधून 40 भारतीयांना विमानाने भारतात आणले आहे. सी-17 विमानाच्या दुसऱ्या फेरीत 150 भारतीयांना मंगळवारी भारतात आणले. त्यामध्ये भारतीय राजदूत, अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि दुतावासामधील काही कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

काबुलमधून सर्व भारतीयांना सुरक्षित आणण्यावर लक्ष केंद्रित
तालिबानने अफगाणिस्तानमधील बहुतांश सर्व मोठी गावे आणि शहरांसह काबुल ताब्यात घेतले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्यदल मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तालिबानींनी अफगाणिस्तानवर सत्ता मिळविली आहे. अमेरिकेच्या मदतीने भारताने अफगाणिस्तानमधून 200 भारतीयांना मायदेशी परत आणण्याची मोहिम पूर्ण केली आहे. काबुलमधून सर्व भारतीयांना सुरक्षित आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.

अफगाणिस्तानमध्ये आणखी 400 भारतीय असण्याचा अंदाज

अफगाणिस्तानमध्ये किती भारतीय आहेत, याची अचूक व तातडीने माहिती मिळविण्याला प्राधान्य असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांनी अफगाणिस्तान स्पेशल सेलला माहिती कळवावी, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये आणखी 400 भारतीय असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका आणि इतर मित्र देशांच्या मदतीने भारतीयांना मायदेशी आणण्याचे भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, काबुल विमानतळावर जमलेल्या लोकांचे तालिबान्यांनी अपहरण केले आहे. यात भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. जवळपास 150 भारतीय नागरिकांचे तालिबान्यांनी अपहरण केल्याचे वृत्त आहे.

भारतीयांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न -

अफगाणिस्तानच्या विविध भागांमध्ये अडकलेल्या भारताच्या नागरिकांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या विशेष अफगाणिस्तान 24 तास काम करीत आहेत. सुमारे सव्वाशे हिंदू-शीख कुटुंबांनी काबूलच्या गुरुद्वारामध्ये आश्रय घेतल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी भारताने युद्धपातळीवर प्रयत्न चालविले आहेत.

हेही वाचा-अफगाणिस्तानचा नॅशनल फुटबॉलपटू अन्वरचा विमानातून कोसळून मृत्यू

हेही वाचा-दहशतवादी, विघातक विचारसरणी काही काळच प्रभावी; त्यांचे अस्तित्व कायमस्वरुपी नसते - नरेंद्र मोदी

हेही वाचा- 'तालिबानवर भारत विश्वास ठेवू शकत नाही, wait and watch ची भूमिका घ्यावी' - तज्ञ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.