ETV Bharat / bharat

India covid vaccination: कोविड लसीकरणाच्या लसींचा 3 कोटींचा साठा पडून

author img

By

Published : Oct 17, 2022, 12:20 PM IST

देशभरात आतापर्यंत 200 कोटींपेक्षा जास्त लस डोस देण्यात आली (covid vaccination government stock of 3 crore) तरी (India covid vaccination) लसीकरणाच्या लसींचा 3 कोटींचा साठा पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

India covid vaccination
कोविड लसीकरण भारत

नवी दिल्ली : देशभरात आतापर्यंत 200 कोटींहून अधिक लस डोस देण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले. (covid vaccination government stock of 3 crore) भारताचा कोविड लसीकरण कार्यक्रम अद्याप संपलेला नाही, यातच सरकारकडे 3 कोटी लसीच्या डोसचा साठा पडून आहे अशी माहिती वृत्त संस्थेने (India covid vaccination) दिली आहे.

लसीकरण सुरुच : सरकारचा कोविड लसीकरण कार्यक्रम अंतिम टप्प्यात आहे. परंतु तो अद्याप संपलेला नाही. सुमारे 3 कोटी कोविड 19 डोस अजूनही सरकारकडे वेगवेगळ्या केंद्रांवर उपलब्ध आहेत. काही महिन्यांसाठी हा साठा पुरेसा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील निर्णय कोविडच्या प्रसारावर अवलंबून असेल. पुढील लसीकरण मोहिमेवर जोर देताना सूत्रांनी सांगितले की लसींची खरेदी सध्या आवश्यक नाही. परंतु याचा अर्थ असा नाही, की सरकारचा कोविड लसीकरण कार्यक्रम संपला (covid vaccination not over) आहे.

केंद्र सरकार वचनबद्ध : देशभरात कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्या सोबत तीची गती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. देशव्यापी लसीकरण 16 जानेवारी 2021 रोजी सुरू झाले. लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्पा 21 जून 2021 रोजी सुरू झाला. लसीकरण मोहिमेला अधिक लसींची उपलब्धतेमुळे वेग आला असे सांगितले जाते.

मोफत लसीकरण : देशव्यापी लसीकरण मोहिमेचा (covid vaccination) एक भाग म्हणून, भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लस मोफत देत आहे. दरम्यान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत एकूण 219.32 कोटी कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत. 16 मार्च 2022 रोजी 12 ते 14 वर्षे वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. 7 कोटींहून अधिक किशोरांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सर्व वयोगटांमध्ये गेल्या 24 तासांत 5 कोटी 2 लाख 619 डोस देण्यात आले.

संसर्गजन्य ओमिक्रॉन : ओमिक्रॉनचे नवीन उप प्रकार अत्यंत संसर्गजन्य आहे. अलीकडील अहवालांनुसार, गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरद्वारे आढळलेल्या बीएफ 7 चे पहिले प्रकरण भारतात सापडले आहे. रविवारी भारतात 2 हजार 401 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. सक्रिय रुग्णांची आकडेवारी 26 हजार 625 वर पोहोचली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एकूण प्रसारापैकी ०.०६ टक्के सक्रिय प्रकरणे (government stock of 3 crore vaccines) आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.