ETV Bharat / bharat

देशात नव्या 1 लाख रुग्णांची नोंद, तर 2 हजार 427 जणांचा मृत्यू - India Coronavirus count

देशात कोरोनाची दुसरी लाट ही धीम्या गतीनं का असेना पण ओसरत असल्याचं दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 636 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 427 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर याचबरोबर 1 लाख 74 हजार 399 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 7, 2021, 5:14 PM IST

नवी दिल्ली - मागील बऱ्याच दिवसांपासून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातल्याचं पाहायला मिळत होतं. पण, आता मात्र देशात कोरोनाची दुसरी लाट ही धीम्या गतीनं का असेना पण ओसरत असल्याचं दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 636 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 427 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर याचबरोबर 1 लाख 74 हजार 399 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील कोरोनाची स्थिती

  • एकूण रुग्ण - 2 कोटी 89 लाख 9 हजार 975
  • एकूण कोरोनामुक्त - 2 कोटी 71 लाख 59 हजार 180
  • एकूण मृत्यू - 3 लाख 49 हजार 186
  • सक्रीय रुग्ण संख्या - 14 लाख 1 हजार 609
  • एकूण लसीकरण संख्या - 23 कोटी 27 लाख 86 हजार 482

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या

कोरोनामुळं भारतासह जगातील केवळ सात देशांमध्ये एक लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. तर देशातील राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येसह सर्वात जास्त मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यात कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या 1 लाख 130 एवढी आहे. तर सध्या 1 लाख 88 हजार 384 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 55 लाख 43 हजार 267 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असून राज्याचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर गेल्या तीन महिन्यात प्रथमच ९५ टक्क्यांवर गेला.

लसीकरणाची अद्ययावत माहिती

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेत कोविड प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत एकूण 23 कोटी 27 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, देशात कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 23,27,86,482 मात्रा देण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.