हैदराबाद - गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 299 नव्या कोरोना ( India Corona Updates ) रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 19 हजार 431 रुग्ण बरे ( india coronavirus cases ) झाले आहे. देशात 1 लाख 25 हजार 76 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हीटी ( india covid 19 cases ) दर हा 4.8 टक्के इतका आहे.
राज्यात 1 हजार 847 नव्या रुग्णांची नोंद - बुधवारी राज्यात कोरोनाचे 1 हजार 847 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर, 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या कोरोना रुग्णांमुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 80 लाख 64 हजार 336 इतकी झाली आहे. तसेच, मृतांचा आकडा 1 लाख 48 हजार 157 इतका झाला आहे. महाराष्ट्रात 11 हजार 889 रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 1 हजार 840 रुग्ण बरे झाल्याने ठीक झालेल्या रुग्णांची संख्या ही 79 लाख 4 हजार 320 इतका झाला आहे.
मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या दुपटीने वाढली - मुंबईत कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊन ३०० च्या दरम्यान रुग्णसंख्या नोंद होत होती. त्यात वाढ होऊन बुधवारपासून रोज ४०० च्या वर रुग्णांची नोंद होत आहे. मंगळवारी ४७९ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. बुधवारी त्यात दुपटीने वाढ होऊन ८५२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २६८ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. ( Mumbai Corona Update )
रुग्णसंख्या वाढली - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८००, तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. २ ऑगस्टला ३२९, ३ ऑगस्टला ४३४, ४ ऑगस्टला ४१०, ५ ऑगस्टला ४४६, ६ ऑगस्टला ४८६, ७ ऑगस्टला ४६५, ८ ऑगस्टला ४०७, ९ ऑगस्टला ४७९, १० ऑगस्टला ८५२ रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचा - Eyes of Farmers Are Teary कांदा उत्पादक शेतकऱ्यांना का रडवत आहे कांदा?