ETV Bharat / bharat

तीन राज्यांत पराभव समोर दिसताच काँग्रेसनं बोलावली 'इंडिया' आघाडीची बैठक - काँग्रेस

INDIA Allience Meeting : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची चौथी बैठक 6 डिसेंबरला दिल्लीत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी एकजुटीनं पुढं जाण्यासाठी प्रादेशिक पक्षांसोबत जागावाटपावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.

INDIA Allience Meeting
INDIA Allience Meeting
author img

By ANI

Published : Dec 3, 2023, 12:44 PM IST

नवी दिल्ली INDIA Allience Meeting : लोकसभा निवडणुकांची सेमिफायनल समजल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सध्याच्या कलानुसार छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानात भाजपानं जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला धक्का दिलाय. तर, तेलंगणात भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) धक्का देत काँग्रेसनं मुसंडी मारलीय. अशातच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘इंडिया’ आघाडीची बैठक बोलावलीय. काँग्रेसनं बुधवारी 6 डिसेंबरला नवी दिल्लीत इंडिया आघाडीतील मित्रपक्षांची बैठक बोलावली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी डीमएमके, तृणमूल काँग्रेससह इंडिया आघाडीतील मित्र पक्षांशी बैठकीबाबत संपर्क साधलाय.

6 डिसेंबरला होणार इंडिया आघाडीची बैठक : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामधील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर 6 डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं या पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल खूप महत्वाचे आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीची पहिली बैठक पाटण्यात, नंतर बंगळुरु आणि मुंबई इथं बैठका झाल्या आहेत. आता दिल्लीत पुढील बैठक होणार आहे. या चार राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाचा परिणाम 'इंडिया' आघाडीवर होऊ शकतो, असं मानलं जातंय. टीएमसी, आप आणि सपासह काही पक्ष जागावाटपाबाबत लवकर चर्चेची मागणी करत आहेत.

बैठकीत कशावर होणार चर्चा : या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी एकजुटीनं पुढं जाण्यासाठी मतभेद दूर करणे, जागावाटपाच्या वाटाघाटी आणि प्रादेशिक पक्षांसोबत जागावाटपावर लक्ष केंद्रित करून आगामी नितीवर या बैठकीत चर्चा होईल.

या पक्षांचा इंडिया आघाडीत समावेश : विरोधी आघाडीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, आप, जेडीयू, आरजेडी, जेएमएम, एनसीपी (शरद पवार), शिवसेना (यूबीटी), सपा, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, सीपीआय (एम), सीपीआय, आरएलडी, एमडीएमके, मक्कल देसिया कच्ची (KMDK), VCK, RSP, CPI-ML (लिबरेशन), फॉरवर्ड ब्लॉक, IUML, केरळ काँग्रेस (जोसेफ), केरळ काँग्रेस (मणी), अपना दल (कामेरवाडी) आणि मनिथनेय मक्कल काची (MMK) या पक्षांचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. तेलंगणात सुरुवातीच्या मतमोजणीत कॉंग्रेस आघाडीवर, काँग्रेसचे निरीक्षक माणिकराव ठाकरे यांनी कुणाला दिलं श्रेय?
  2. Chhattisgarh Elections Result 2023 Updates : चौथ्या फेरीच्या मतमोजणीनंतर पाटण जागेवर मुख्यमंत्री भूपेश बघेल आघाडीवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.